Senior NCP leader Sharad Pawar lashed out at Chief Minister Devendra Fadnavis : पुस्तक न वाचताच सत्ताधाऱ्यांना कसं कळलं की ते बाल साहित्य आहे
Mumbai : खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकावर सत्ताधाऱ्यांकडून गेले दोन दिवस प्रचंड टीका होत आहेत. कुणी सांगितलं की मी बाल साहित्य वाचत नाही, तर कुणी आणखी काही सांगितलं. पण ते पुस्तक आतुन न वाचताच सत्ताधारी पक्षांच्या लोकांना कसं समजलं, याचे मला आश्चर्च वाटते, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.
संजय राऊत यांच्या पुस्तकाचे काल (१७ मे) प्रकाशन झाल्यानंतर शरद पवार उपस्थितांना संबोधित करत होते. ते म्हणाले, सत्तेचा गैरवापर कसा होतो, याचे उत्तम लिखाण या पुस्तकाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेच्या समोर आलं आहे. ईडीची यंत्रणा कशी वागते, याचंही उत्तम विवेचन या पुस्तकामध्ये आहे. हे सांगताना ईडीच्या संदर्भातील पी. चिदंबरम यांच्यासोबत झालेल्या संवादाचा एक किस्सा पवारांनी सांगितला.
Heaven in hell : संजय राऊत यांनी पत्रा चाळीतील भ्रष्टाचार बाहेर काढला, अन् त्यांनाच जेलमध्ये टाकलं !
केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात मी असताना पी. चिदंबरम आमचे सहकारी होते. कायद्यामध्ये दुरूस्ती करण्याची आवश्यकता कशी आहे, यासंदर्भातील एक प्रस्ताव त्यांनी मंत्रिमंडळासमोर आणला. तो वाचल्यानंतर मी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना सांगितलं की, हा प्रस्ताव अत्यंत घातक आहे. आपण हा करता कामा नये. जेव्हा गुन्हेगार म्हणतो, पोलीस सांगतात, ईडी म्हणते त्यांनी स्वतःहून मी गुन्हा केला नाही, हे सिद्ध करायचं. त्या संबंधाची तरतूद या कायद्यामध्ये प्रस्तावित केली. त्याला मी सक्त विरोध केला.
Jay Hind Yatra : जय हिंद तेव्हाच म्हणता येईल, जेव्हा सेनेवर विश्वास दाखवाल !
उद्या राज्य बदललं तर त्याचे परिणाम आपल्यालासुद्धा भोगावे लागतील, असंही मी तेव्हा सांगितलं होतं. झालंही तसंच, आमचं राज्य गेलं आणि पहिली कारवाई पी. चिदंबरम यांच्यावरच करण्यात आली. त्यांना अटक केली गेली. त्या ठिकाणी सत्तेचा गैरवापर झाला. विशेषतः विरोधकांवर अशा केसेस मोठ्या प्रमाणात केल्या जातील, ही शंका माझ्यासारख्यांना होती, असे शरद पवार यांनी सांगितले.