Breaking

Vidarbha Movement : विदर्भाच्या विकासासाठी ‘समृद्ध विदर्भ’ मोहीम

‘Prosperous Vidarbha’ committee for the development of Vidarbha : समितीची स्थापना; शेती, उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न

Akola विदर्भाच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी ‘समृद्ध विदर्भ’ या समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सर्व धर्मांमध्ये सामाजिक ऐक्य आणि समानता प्रस्थापित करणे होय. समितीचे अध्यक्ष माजी मुख्य आयकर आयुक्त धनंजय धार्मिक असून, संस्थेचे मुख्य सल्लागार डॉ. आर. बी. ठाकरे आहेत. ‘समृद्ध विदर्भ’ वर्षभर रचनात्मक उपक्रम राबवून राष्ट्रीय पातळीवर विदर्भाचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करणार आहे, अशी माहिती संस्थेचे गोविंद पोद्दार यांनी दिली.

अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी संस्थेच्या उद्दिष्टांबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी डॉ. अनिल वाघ, आचार्य संजय कटकमवार, समन्वयक घनश्याम पुरोहित, डॉ. पूजा खेतान, गजानन पुंडकर, रेखा राऊत, कल्याणी अय्यर आदी मान्यवर उपस्थित होते.

Local Boday Elections : अमरावती जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात ७ जागांची वाढ?

यावेळी ‘समृद्ध विदर्भ’च्या प्रतिनिधींनी विदर्भाच्या सध्याच्या समस्या देखील मांडल्या. वीज, सिमेंट, कोळसा, लोहखनिज, मॅगनीज, डोलोमाइट, टंगस्टन, सोने आदी खनिजसंपदा असूनही विदर्भात कुपोषण, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, महिलांची असुरक्षितता, पिण्याच्या पाण्याचा अभाव आणि विजेच्या समस्यांमुळे विदर्भ मागे पडला आहे.

यासाठीच ‘समृद्ध विदर्भ’च्या माध्यमातून या भागाचा विकास साधण्यासाठी व्यापक प्रयत्न केले जाणार आहेत. या उपक्रमात समाजातील प्रत्येक सक्षम नागरिकाने सहभाग नोंदवावा, असे आवाहन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या वेळी केले.

Buldhana Congress : तिरंगा यात्रेतून जवानांना सलाम, भाजपचा निषेध!

समृद्ध विदर्भ संस्थेच्या माध्यमातून पुढील उपक्रम राबविण्यात येणार आहेत:

केंद्र व राज्य शासनाच्या योजनांविषयी जनजागृती आणि प्रभावी अंमलबजावणी
लहान कुटुंब, आनंदी कुटुंब अभियान
शेती आणि शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास
बेरोजगारांना रोजगाराच्या संधी निर्माण करणे
गावांमध्ये लघुउद्योग उभारणे आणि लाभार्थ्यांना मालकी मिळवून देणे
ग्रामीण रोजगार, पशुपालन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
उद्योग व उद्योजकतेला प्रोत्साहन
शिक्षण व्यवस्थेत सुधारणा
महिला सक्षमीकरण, आरक्षण व सुरक्षा
आरोग्य सेवा सुधारणा