Improve the water supply system within a month : एक महिन्याचा अल्टिमेटम; पाणी पुरवठा यंत्रणेत सुधार करण्याचे आदेश
Nagpur नागपूर शहराला गरजेपेक्षा अधिक पाणी मिळत असतानाही लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे चोवीस तास पाणी पुरवठा योजना असतानाही टँकरची गरज पडत आहे. यासंदर्भातील वास्तव पुढे आल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी ओसीडब्ल्यू Orange City Waters आणि नागपूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. एक महिन्याच्या आत सुधारणा केल्या नाहीत तर कंपनीवर कारवाी करण्याचा इशाराही त्यांना दिला आहे.
नागपूर शहरातील पाणी पुरवठा यंत्रणेमध्ये ओसीडब्ल्यूने एक महिन्याच्या आत सुधारणा करावी. अन्यथा कारवाई करण्यात येईल, या शब्दांत नितीन गडकरी यांनी ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना बजावले. त्याचवेळी नागपूर महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. महानगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या बैठकीला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचीही उपस्थिती होती.
त्यासंदर्भात दोन आठवड्यांपूर्वी गडकरी यांच्या निवासस्थानी बैठक झाली होती. या बैठकीत गडकरींनी सूचना दिल्या होत्या. त्याचा आढावा आज, सोमवार, दि. १९ मे रोजी घेण्यात आला. या बैठकीला आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी आदींची उपस्थिती होती.
Nitin Gadkari : गडकरींनी रस्त्यांच्या कामांची पाहणी केली, पण..?
नागपूर शहरात कोणत्या भागात पाणी टंचाई आहे, सर्वाधिक टँकर कोणत्या भागात वापरले जातात, कोणत्या भागात मोठ्या प्रमामात गळती आहे, अनधिकृत जोडण्या किती प्रमाणात आहेत, याचे सर्वेक्षण करावे. नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे अहवाल सादर करावा. त्यात सुधारणा करून नागरिकांना नियमीत पाणीपुरवठा होईल, याची व्यवस्था करावी. एक महिन्याच्या आत यावर अंमलबजावणी झाली नाही, तर महापालिकेच्या माध्यमातून कारवाई करण्यात येईल, असे गडकरींनी ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट केले.
Sudhir Mungantiwar Meets Nitin Gadkari : मुनगंटीवारांनी मागणी केली, गडकरींची ‘ऑन दि स्पॉट’ मंजुरी!
नागनदी प्रकल्पाच्या संदर्भात सरकारच्या आदेशांनुसार सर्वेक्षण करावे आणि तीन महिन्यांच्या आत निविदा काढाव्या, अशा सूचना त्यांनी कंपनीला दिल्या. त्याचवेळी पावसाळी नाल्यांंचा या प्रकल्पात समावेश करण्यासंदर्भातही विचार करावा, असे ते म्हणाले. पोहरा नदी प्रकल्पाच्या कामाची सद्यस्थिती गडकरी यांनी जाणून घेतली.