Breaking

Maharashtra Government : मी स्वतः फोन करून सरकारच्यावतीने त्यांची माफी मागितली !

BJP leader Chandrashekhar Bawankule apologizes to Chief Justice of India Bhushan Gavai : पुढील काळात असं होणार नाही, याची पूर्ण काळजी घेऊ

Nagpur : देशाचे सरन्यायाधीश भूषण आर. गवई महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. प्रोटोकॉलनुसार महाराष्ट्रातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी त्यांच्या दौऱ्यात उपस्थित राहायला हवे होते. पण एकही अधिकारी त्यांच्या दौऱ्यात उपस्थित झाला नाही. त्यामुळे भूषण गवई यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. विरोधी पक्षाच्या नेत्यांनीदेखील या घोडचुकीवरून राज्य सरकारवर ताशेरे ओढले.

सरन्यायाधीशांच्या अपमान नाट्याच्या संदर्भात आज (१९ मे) राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता, सरन्यायाधीश भूषण गवई मुंबईत आले असताना ज्या पद्धतीने त्यांचा प्रोटोकॉल पाळला गेला नाही, हे योग्य झाले नाही. मी स्वतः त्यांना फोन करून राज्य सरकारच्यावतीने त्यांची माफी मागितली आहे. पुढील काळात असं होणार नाही, याची पूर्ण काळजी महाराष्ट्र सरकार घेणार आहे, असे ते म्हणाले.

Sanjay Raut and team : बरं झालं..! शरद पवारांनीच महाविकास आघाडीचे कान टोचले !

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत X वर प्रतिक्रिया दिली आहे. त्यासंदर्भात विचारले असता, प्रकाश आंबेडकर हे सरकारमध्ये नाहीत आणि सरकारच्या मंत्रिमंडळातही नाहीत. त्यामुळे त्यांना माहिती नाही. पण सरकार प्रत्येक गोष्ट उघड करत नाही. दहशतवाद विरोधी कारवाई करताना बऱ्याच गोष्टी गोपनीय ठेवाव्या लागतात. संरक्षण संदर्भातील माहिती गुप्त ठेवावी लागते. दहशतवाद्यांना संपवण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवावा, असे महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले.

Maharashtra Navnirman Sena : चिखलीत 4.50 कोटींचा सिंचन विहीर घोटाळा?

‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर जल्लोष करण्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, भारत – पाकिस्तान युद्धाच्या विजयाचा जल्लोष कुणीच केलेला नाही. सैनिकांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी तिरंगा यात्रा काढल्या जात आहेत. दहशतवाद संपवण्याचे काम आपले सरकार आणि सैन्य करत आहे, अशा वेळी आपण त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे, हे अमित ठाकरे यांनी समजून घ्यावे.