Breaking

Maharashtra Politics : भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश, आता नाशिकचे पालकमंत्री कोण? बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं..

Chhagan Bhujbal’s inclusion in the cabinet, who is the guardian minister of Nashik? Chandrashekhar Bawankule clearly stated : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य वेळी घोषणा करतील

Nagpur : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून डावलण्यात आले होते. पण आज (२० मे) त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. सकाळी १० वाजता मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळात वापसीची शक्यता आता जवळपास संपुष्टात आली आहे. छगन भुजबळ कॅबिनेट मंत्री झाल्यामुळे नाशिकचे पालकमंत्री कोण, हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उपरोक्त प्रश्न विचारला असता ते म्हणाले, छगन भुजबळ राज्यातील महत्वाचे नेते आहेत. नगरसेवक ते उपमुख्यमंत्रीपदापर्यंत त्यांनी सरकारमध्ये यशस्वीपणे काम केले आहे. भुजबळांसारख्या महत्वाच्या, दांडगा अनुभव असलेल्या आणि ओबीसी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्याला मंत्रिमंडळात स्थान देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या विकासाच्या दिशेने महत्वाचे पाऊल टाकले आहे.

Insult of Chief Justice : सरन्यायाधीश आंबेडकरी विचारांचे आहेत म्हणून का..?

छगन भुजबळ यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली, याचा आनंद आहे. आता देवेंद्र फडणवीस सरकार आणखी मजबूत होईल. महाराष्ट्राच्या विकासाला साजेसे काम छगन भुजबळ करतील, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. नाशिकच्या पालकमंत्रीबद्दल सध्यात जास्त काही सांगता येणार नाही. कारण हे मुख्यमंत्र्यांचे अधिकार आहेत. मुख्यमंत्री यासंदर्भात योग्य वेळी घोषणा करतील, असे बावनकुळे म्हणाले.

Kerala Lottery : गोव्याच्या सुपुत्राचे महाराष्ट्राशी असलेले भावनिक नाते उल्लेखनीय !

पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता, कोणत्या खासदारांना पाठवायचे, यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी टिपणी करणे योग्य नाही. आम्ही विश्वभर दहशतवाद विरोधी लढाई सुरू केली आहे. हा संदेश देण्यासाठी खासदार जगातील विविध ठिकाणी जात आहेत. दहशतवाद मोडून काढण्यासाठी संपूर्ण देश प्रयत्न करत आहे. सर्व पक्षांना सोबत घेऊन देश जोडण्याचा हा प्रयत्न आहे, असे महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले. मुंबईत कोरोनाचे रुग्ण दगावले, याबाबतीच विचारले असता, यासंदर्भात अधिक माहिती घेतो, असे त्यांनी सांगितले.