Breaking

Chhagan Bhujbal returns as minister: भुजबळांच्या निमित्ताने राजकीय पक्षांचे एकत्रीकरण?

Workers celebrated the occasion : देऊळगाव राजामधील कार्यक्रम ठरतोय चर्चेचा विषय

Buldhana महाराष्ट्रातील राजकारणातील जाणते नेते म्हणून ओळख असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून राज्य मंत्रिमंडळात नियुक्ती झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पहायला मिळत आहे. देऊळगाव राजा शहरातही भुजबळ यांच्या नियुक्तीचा जल्लोष फटाके फोडून व पेढे वाटून करण्यात आला.

बसस्थानक चौकात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमात सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेतेमंडळींची उपस्थिती लक्षवेधी ठरली.

Maharashtra Politics : भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश, आता नाशिकचे पालकमंत्री कोण? बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं..

या कार्यक्रमात आमदार मनोज कायंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी, समता परिषदेचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दीपक बोरकर, भाजपचे जिल्हा सचिव डॉ. शंकर तळबे यांच्यासह अनेक पक्षांचे प्रतिनिधी सहभागी झाले. विविध पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते एका व्यासपीठावर एकत्र येऊन भुजबळ यांच्या कार्याचा गौरव करताना दिसले, हे विशेष.

भुजबळ यांचा राजकीय प्रवास हा सामाजिक न्यायाच्या चळवळीशी निगडित राहिलेला असून, ओबीसी समाजासाठी त्यांनी लढलेले लढे आजही लोकांच्या स्मरणात आहेत. त्यामुळे त्यांच्या मंत्रिमंडळात पुनर्प्रवेशाला सामाजिक घटकातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

Insult of Chief Justice : सरन्यायाधीश आंबेडकरी विचारांचे आहेत म्हणून का..?

या सोहळ्याने देऊळगाव राजा शहरात केवळ आनंदोत्सव नव्हे, तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व समविचारी घटकांचा जमलेला पाठिंबा हा एक राजकीय संदेश देणारा क्षण ठरला, असे विश्लेषण सुरू झाले आहे.