Center head promotion process in controversy : केंद्रप्रमुख पदोन्नती रखडली, जिल्ह्यात ६० पदे रिक्त
Nagpur जिल्ह्यात सुमारे ६० केंद्रप्रमुख पदे रिक्त आहेत. यापैकी अनेक पदे पदोन्नतीद्वारे भरावयाची आहेत. शासनाच्या निर्देशांनुसार, शिक्षकांच्या बदल्या सुरू होण्यापूर्वी ही पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक होते. परंतु, जिल्हा परिषदेच्या अनास्थेमुळे केंद्रप्रमुख पदोन्नती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
प्रारंभी प्रशासनाने यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या; मात्र, शिक्षक संघटनांकडून मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदविले गेल्याने ही प्रक्रिया तात्पुरती थांबविण्यात आली आहे. शासनाने शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांपूर्वी केंद्रप्रमुख पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले असताना जिल्हा परिषद प्रशासनाने मात्र ही प्रक्रिया प्रलंबित ठेवली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठा संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली आहे.
Chandrashekhar Bawankule : बावनकुळे म्हणाले, कामात दिरंगाई, तर होईल कारवाई!
यापूर्वी झालेली तद्र्थ केंद्रप्रमुख पदोन्नती प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबविल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच केंद्रप्रमुख पदासाठी आवश्यक तीन वर्षांच्या अनुभवाची अट डावलून पदोन्नती देण्यात आली. सामाजिक शास्त्र संवर्गातील जागांवर इतर विषयांतील शिक्षकांची नियुक्ती, अटी, शर्तीचे पालन न होणे, तदर्थ पदोन्नतीचा कालावधी ११ महिने असूनही, त्यांना तीन वर्षे सलग पदावर ठेवणे, असे आक्षेप घेण्यात आले आहेत.
१४ जून २०१४ ची अधिसूचना अद्याप अधिक्रमित न झाल्याने, वेगवेगळ्या विभागांकडून वेळोवेळी परस्परविरोधी शासन निर्णय, परिपत्रके आणि मार्गदर्शन पत्रके काढली गेली. त्यामुळे शिक्षक संघटनांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. या सगळ्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, जि. प. प्रशासन आणि शिक्षण विभागाकडून कोणतीही ठोस भूमिका घेतलेली दिसून येत नाही.
Nagpur Congress : काँग्रेसमधील धुसफुस संपेना, महत्त्वाची बैठक नेत्यांविना
शिक्षक संघटनांकडून वेळोवेळी आक्षेप मांडले गेले असतानाही त्याचे शासन नियमांनुसार निराकरण करून प्रक्रिया पुढे नेण्याचे प्रयत्न होताना दिसत नसल्याचे आरोप होत आहेत.