Former MLA Narayanrao Gavankar joins Shiv Sena : माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांचा शिवसेनेत प्रवेश
Akola आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने अकोला जिल्ह्यात मोठे संघटनात्मक फेरबदल करत दोन नवीन जिल्हाप्रमुखांची नियुक्ती केली आहे. मुंबईतील बाळासाहेब भवन येथे झालेल्या बैठकीत बाळापूरचे माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्याकडे अकोट आणि बाळापूर तालुक्यांची जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
सोबतच माजी जिल्हा परिषद सभापती चंद्रशेखर पांडे (गुरुजी) यांच्याकडे मूर्तिजापूरचा प्रभार स्वप्नात आला आहे. या घटना घडामोडीनंतर अकोला जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटात मात्र नाराजीचा सूर असून, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्याबाबत नाराजीचा सूर आहे.
Amravati NCP : राष्ट्रवादी काँग्रेसची ‘जंबो’ कार्यकारिणी जाहीर
अकोला जिल्हा परिषदेचे माजी सभापती चंद्रशेखर पांडे (गुरुजी) यांचीही जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाली असून, त्यांच्याकडे मूर्तिजापूर तालुक्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या नवीन नियुक्त्यांमुळे अकोला जिल्ह्यात शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची संख्या चार झाली आहे. विद्यमान पदाधिकारी श्रीरंग पिंजरकर आणि अश्विन नवले यांच्याकडील काही तालुक्यांचा प्रभार कमी करण्यात आला आहे.
संपर्क नेते गोपीकिशन बाजोरिया यांच्या पुढाकारातून झालेल्या या संघटनात्मक बदलांमुळे जुन्या पदाधिकाऱ्यांमध्ये त्यांचे बाबत नाराजीचा सूर दिसून येत आहे. मूळ शिवसेनेचे दोन गट पडल्यापासून सोबत असलेले व जिल्हा प्रमुखाची जबाबदारी सांभाळणारे अश्विन नवले यांनी अप्रत्यक्षपणे पक्ष संघटनेत बाजोरिया यांच्या मनमानी बद्दल नाराजीचा सूर आवळला आहे.
Narendra Modi : नेताजी सुभाषचंद्र बोस स्टेशनचे लोकार्पण मोदींच्या हस्ते
त्याला प्रत्युत्तर देत बाजोरिया यांनी, शिवसेनेत काम करणाऱ्यांचा सन्मान केला जातो. तक्रारी किंवा कुरघोडी नव्हे, तर कार्यक्षमतेवरच वरिष्ठांचे लक्ष असते, असे सांगून तक्रारी करणाऱ्यांना यापुढे पक्षात थारा मिळणार नाही, असा इशारा दिला आहे.