Vanchit bahujan aaghadi preparing for Local body elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी
Akola जिल्हा परिषद व पंचायत समितीचे मुदत येत्या 16 जनेवारीला संपत आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी तालुका नियोजन बैठकांचे नियोजन केले असून या बैठकीला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढू इच्छिणाऱ्या उमेदवारांना उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
अकोला महापालिकेवर गेल्या तीन वर्षांपासून प्रशासन असून, आता जिल्हा परिषद व पंचायत समितीची मुदतही आठ दिवसात संपणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. भारतीय जनता पक्षाने यापूर्वीच त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही बैठकांवर भर दिला आहे. आता वंचित बहुजन आघाडीनेही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी बैठकांचे नियोजन केले आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत या निवडणुका लढण्यासाठी इच्छुक असणारे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी या बैठकांचे नियोजन करण्यात आले. तालुका व शहराच्या महत्त्वपूर्ण बैठकांना दिलेल्या तारखेला उपस्थित राहावे, अशी सूचनाही पक्षातर्फे करण्यात आली आहे.
बैठकांचे नियोजन
अकोट तालुका व शहर-
गुरुवार, नऊ जानेवारी, वेळ दुपारी 1 वाजता
ठिकाण- विश्राम गृह अकोट
बार्शीटाकळी तालुका व शहर-
शुक्रवार, 10 जानेवारी, वेळ दुपारी 1वाजता
ठिकाण- रेस्ट हाऊस बार्शीटाकळी
पातूर तालुका व शहर-
शनिवार, 11 जानेवारी, वेळ दुपारी 01 वाजता
ठिकाण- संत सेवालाल भवन पातूर
अकोला तालुका पूर्व व पश्चिम-
सोमवार, 13 जानेवारी, दुपारी 01 वाजता
ठिकाण-अशोक वाटिका अकोला
मूर्तिजापूर तालुका व शहर
मंगळवार, 14 जानेवारी, दुपारी 01 वाजता
ठिकाण- रेस्ट हाऊस मूर्तिजापूर
तेल्हारा तालुका व शहर
गुरुवार, 16 जानेवारी, दुपारी 01 वाजता
ठिकाण- रेस्ट हाऊस तेल्हारा
बाळापूर तालुका व शहर
शुक्रवार, 17 जानेवारी,
दुपारी 01 वाजता
अकोला महानगर पूर्व आणि पश्चिम
शनिवार, 18 जानेवारी,
वेळ दुपारी 01 वाजता
ठिकाण- अशोक वाटिका अकोला