Devendra Fadnavis government is tyrannical, alleges state Congress president Harshvardhan Sapkal : काँग्रेसने शेतकऱ्यांना अनेकदा मदत केली
Mumbai : महायुतीने कर्जमाफीचे दिलेले आश्वासन पाळले नाही. आता खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच मोठे संकट आल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. कर्जमाफी केली नसली तरी किमान कर्जाचे पुनर्गठन तरी करून द्यावे. खरीपासाठी सरकारचे काहीच नियोजन नाही. शेतकऱ्यांना या हंगामासाठी बियाणे व खते सरकारने मोफत द्यावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
मुंबईतील गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत सपकाळ बोलत होते. यावेळी ते म्हणाले. जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत आला, तेव्हा तेव्हा त्याला मदत करण्याचे काम काँग्रेस सरकारने केलेले आहे. पिकांवर रोग आला, लाल्या पडला, गारपीट झाली, अवकाळी पावसाने नुकसान झाले की आमच्या सरकारांनी कशाचीही पर्वा न करता शेतकऱ्याला मदत केली आहे. आताचे सरकार मात्र शेतकऱ्यांच्या हिताच्या विचारांचे नाही. केवळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन सोपस्कार करू नये तर तातडीने मदत केली पाहिजे.
Maharashtra Cabinet : राज्याचे मंत्रिमंडळ अमित शाह यांची खुशामत करण्यात मग्न !
राज्यातील शेतकरी आधीच संकटांचा सामना करत आहे. त्यात मुसळधार पावसाने त्याला आणखीनच अडचणीत टाकले आहे. या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले. हातातोंडाशी आलेले पिकही वाहून गेले. निसर्ग लहरी झाला अन् राज्यातील फडणवीसांचे सुलतानी सरकार जनतेच्या मुळावर उठले आहे. संकटातील शेतकऱ्यांला मदतीची गरज आहे. सरकारने पंचनाम्याचे केवळ सरकारी सोपस्कार करू नये, तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २० हजार रुपयांची मदत तातडीने द्यावी, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.