Breaking

SP of Buldhana : पोलीस अधिक्षकांनी स्पष्टच सांगितले, ‘अवैध धंदे खपवून घेणार नाही’

Illegal businesses will not be tolerated : पदभार स्वीकारताच आक्रमक, पोलीस दलाची आढावा बैठक

Buldhana बुलढाणा जिल्ह्याचे नव्याने पदभार स्वीकारलेले पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी पहिल्याच आढावा बैठकीत स्पष्ट संदेश दिला – “जिल्ह्यात एकही अवैध धंदा खपवून घेतला जाणार नाही. अशा धंद्यांमध्ये गुंतलेल्यांवर तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाईल.”

२६ मे रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, प्रदीप पाटील, मनीषा कदम, तसेच स्थानीय गुन्हे शाखा, जिल्हा विशेष शाखा आणि सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.

Mahavitaran : समस्या सोडवा, अन्यथा खुर्च्या रिकाम्या करा!

बैठकीच्या सुरुवातीस तांबे यांनी जिल्ह्याची भौगोलिक रचना, गुन्हेगारीचा आलेख आणि समाजविघातक घटकांवरील प्रतिबंधात्मक उपाययोजना यांचा आढावा घेतला. त्यानंतर आपल्या ठाम आणि थेट शैलीत संपूर्ण जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश त्यांनी दिले.

“पोलीस अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता पूर्ण प्रामाणिकपणे कर्तव्य बजवावे,” असा आदेश त्यांनी दिला. कायदा-सुव्यवस्थेचे अचानक प्रसंग कौशल्याने हाताळणे, सण-उत्सव काळात बाजारपेठा, बँका, शासकीय कार्यालये, सराफा दुकाने, एपीएमसी याठिकाणी सतत गस्त वाढवणे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

Eknath Shinde Shiv Sena : समस्या सोडवल्या नाही तर उलटं टांगण्यात येईल, शिवसेनेचा इशारा

राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, समृद्धी महामार्ग व जिल्हा मार्गांवर नियमित पेट्रोलिंग ठेवण्याचे निर्देश त्यांनी पोलीस विभागास दिले. पोलीस अंमलदारांच्या वैयक्तिक व कार्यालयीन समस्या सोडवण्याचा पाठपुरावा, तसेच जनतेशी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचे आवाहनही त्यांनी बैठकीदरम्यान केले.