State Home Ministry continues to transfer police officers : राज्य सरकारच्या गृह विभागाने केला फेरफार, बदल्यांचे सत्र सुरूच
Amravati राज्य सरकारच्या गृहविभागाने २७ मे रोजी पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या जाहीर केल्या. यामध्ये राज्यभरातील ५५६ पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्यांचा समावेश आहे. यापैकी अमरावती परिक्षेत्रात २० तर अमरावती शहर पोलिस आयुक्तालयात आठ नव्या पीएसआयंची बदली झाली आहे.
अमरावती परिक्षेत्रात आलेले नवे पीएसआय :
गडचिरोलीहून प्रशांत डगवार, सचिन सरकटे आणि सचिन ठेंग, गोंदियाहून शरद सैंदाणे, नांदेडहून अमोल गुंडे, राज्य गुन्हे शाखेतील धरती काळे, हिंगोलीहून शिवानंद स्वामी, रागुविमधून सागर फेरण, बुलढाण्याहून प्रिया उमाळे, जळगावहून नयन पाटील, हिंगोलीहून नागोराव जाधव, नांदेडहून दिनेश शिंगणकर, रागुविमधून शुभांगी ठाकरे, नागपूर शहरातून अनिल इंगोले, संतोष खांडेकर, अविनाश जायभाये, गणेश मुंढे, शंकर बोंड, मसुपमधून राजेश यलगुलवार आणि विकास खडसे यांचा समावेश आहे.
Nagpur Municipal Corporation : रस्ते खोदून ठेवले आणि पाऊस लवकर आला, आता मनपाला आली जाग
अमरावती शहर आयुक्तालयात बदली झालेले पीएसआय :
भंडाऱ्याहून अमोल कोल्हे, अमरावती ग्रामीणहून विठ्ठल वाणी व वीणा पंडे, वाशिमहून रवींद्र ताले, यवतमाळहून दीपक रामे आणि धनंजय रत्नपारखी, लातूरहून गजानन चौधरी, नागपूरहून उत्तम जायभाये हे आठ पीएसआय अमरावती शहर पोलिस आयुक्तालयात रुजू होणार आहेत.
MP Balwant Wankhede : शिवशाही बंद पडली, खासदारांनी जागेवरूनच केला अधिकाऱ्याला फोन
अमरावती ग्रामीणमधून चार अधिकारी बाहेर
दरम्यान, अमरावती ग्रामीण विभागातून चार पीएसआयंची इतर परिक्षेत्रात बदली झाली आहे. यामध्ये गणेश मोरे यांची नागपूर परिक्षेत्रात, विकास राठोड यांची नांदेड परिक्षेत्रात, चंद्रकांत बोरसे यांची नाशिक परिक्षेत्रात, तर संजीवनी पुंडगे यांची नागपूर परिक्षेत्रात बदली करण्यात आली आहे.