Breaking

Operation Prahar : अकोला पोलिसांचे ‘ऑपरेशन प्रहार’; अवैधतेचा अंत, प्रहाराचा प्रारंभ

Police Superintendent takes strong action against illegal businesses : पोलीस अधिक्षकांचा कारवाईचा धडाका; प्रभावी अंमलबजावणी

Akola जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबतच अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्यासाठी नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी ‘ऑपरेशन प्रहार’ या विशेष मोहिमेची घोषणा केली आहे. “अवैधतेचा अंत, प्रहाराचा प्रारंभ” या ब्रीदवाक्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध अवैध व्यवसायांवर कठोर कारवाईचा आरंभ करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक चांडक यांनी पदभार स्वीकारताच गोवंश तस्करी, बेकायदेशीर दारू उत्पादन व विक्री, जुगार अड्डे, मटका, आणि अन्य अवैध व्यवसायांविरोधात कारवाईचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. या मोहिमेंतर्गत कोणत्याही प्रकारचा अवैध व्यवसाय सहन केला जाणार नाही, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याचे प्रमुख व संबंधित अधिकारी यांना यासाठी कडक निर्देश देण्यात आले आहेत.

MLA Sajid Khan Pathan : अकोल्यात अवकाळी पावसाचे थैमान, जनजीवन विस्कळीत

नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. दिनांक २८ मे २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस स्टेशन चान्नी हद्दीतील आलेगाव येथे अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत वरली मटका खेळताना ६ जणांना ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळावरून मटका खेळण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य, रोख रक्कम २६,२९० रुपये, तीन मोटरसायकल (मूल्य रु. १,६०,०००), तीन मोबाईल (मूल्य रु. २१,०००), सहा प्लास्टिक खुर्च्या आणि दोन पाण्याचे कॅन (एकूण मुद्देमाल – रु. २,१४,२९०) जप्त करण्यात आला आहे.

100 Days Program : अकोल्याचे मृद व जलसंधारण कार्यालय राज्यात प्रथम

पोलीस स्टेशन बार्शीटाकळी हद्दीतील जामा मशिद परिसरातील शेख शारीक हा व्यक्ती गोवंश कत्तल करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून अंदाजे ३१० किलो गोमांस (किंमत – रु. ६३,५७०) जप्त केले. आरोपीविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

तसेच, दिनांक २५ मे रोजी गोवंश चोरीच्या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक गाय व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण रु. २,६७,००० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Local Body Elections : सर्कल रचनेसाठी राजकीय पक्षांत रस्सीखेच

“जिल्हा अवैध धंदेमुक्त व सुरक्षित व्हावा, कायद्याचा धाक निर्माण व्हावा,” ही पोलीस अधीक्षकांची भूमिका आहे. यासाठी नागरिकांनी पुढे येऊन पोलिसांना सहकार्य करावे, आपल्या परिसरात कुठेही अवैध कृत्ये सुरू असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ‘ऑपरेशन प्रहार’ ही मोहिम जनतेच्या सहभागातून अधिक प्रभावी होईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.