NIT Chairman Complaint of caste abuse Another feat of the controversial Bunty Shelke : वादग्रस्त बंटी शेळकेंचा आणखी एक प्रताप
Nagpur Bunty Shelke विधानसभा निवडणुकीपूर्वी शांत असलेले काँग्रेसचे बंटी शेळके निवडणुकीपासून पुन्हा सक्रीय झाले आहेत. विशेषतः एखाद्या कृतीतून त्यांनी वाद ओढवून घेतला नाही, असे होत नाही. आता त्यांनी चक्क नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापतींनाच जातीवाचक शिविगाळ केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादामुळे बंटी शेळके चर्चेत आले आहेत.
विविध कारणांमुळे वादात राहणारे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस बंटी शेळके यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात नासुप्रचे सभापती संजय मीणा यांनी शेळके यांनी जातिवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार केली होती. त्याआधारे शेळके यांच्याविरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे शेळकेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Ajit Pawar Eknath Shinde : राष्ट्रवादीच्या टार्गेटवर एकनाथ शिंदेंचा विभाग!
६ जानेवारी रोजी शेळके यांनी पाऊण वाजण्याच्या सुमारास नासुप्र मुख्यालयावर मोर्चा काढला होता. काँग्रेसचे शहरातील मोठ्या पदाधिकाऱ्यांनी अगोदरच मोर्चाला पाठ दाखविली होती. शेळके व कार्यकर्त्यांना नासुप्रच्या प्रवेशद्वारावर पोलिस व सुरक्षारक्षकांनी अडविले. त्यामुळे त्यांनी प्रवेशद्वारावर चढून नारेबाजी केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना बाईट दिले.
यावेळी त्यांनी मीणा यांच्याबाबत शिवराळ भाषेचा उपयोग केला. तसेच मीणा यांच्या इभ्रतीवरच वार करावा लागेल असे म्हटले. हा प्रकार मीणा यांना सायंकाळी प्रसारमाध्यमांतून लक्षात आला. मीणा हे अनुसूचित जमाती वर्गातून येतात. याची माहिती असूनदेखील शेळके यांनी जाणुनबुजून माझ्या जातीचा उल्लेख करत बदनामी केली व अपमान केला, अशी तक्रार त्यांनी सदर पोलिस ठाण्यात दिली.
CM Devendra Fadnavis : नागनदीनंतर आता पोहरा नदीचे ‘मेकओव्हर’ !
पोलिसांनी शेळकेंविरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विधानसभा निवडणूकीदरम्यान शेळके यांनी मध्य नागपुरातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढविली होती. मतदानाच्या दिवशीच त्यांनी व त्यांच्या समर्थकांनी ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या निवडणूक आयोगाच्या कारवर हल्ला करत तोडफोड केली होती. पराभवानंतर शेळके यांनी थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कुठलीच मदत न केल्याचा आरोपदेखील केला होता.








