Congress leaders : सोम्या गोम्यांच्या पोकळ धमक्यांना आम्ही भीक घालत नाही !

Harshvardhan Sapkal confirms Rahul Gandhi’s statement about Savarkar : सावरकरांवर राहुल गांधी जे बोलले, ते ऐतिहासिक सत्य

Mumbai : राहुल गांधी हे सावरकर यांच्याबद्दल काहीही चुकीचे बोलले नाहीत. त्यांनी अपशब्द वापरलेले नाहीत. इतिहासातील दाखले देऊन त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. त्यांची आजी इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. आज काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना धमक्या दिल्या जात आहेत. आम्ही त्याचा निषेध करतो आणि कुण्याही सोम्या गोम्यांच्या धमक्याला राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष भीक घालत नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांना धमक्या देणाऱ्यांना काँग्रेसचा कार्यकर्ताच चोख उत्तर देईल. राहुल गांधी यांनी इतिहासातील दाखले देऊन त्यांची भूमिका मांडली आहे. सावरकर यांच्याबद्दल समिक्षाच करायची असेल तर आतापर्यंत अनेक तज्ज्ञ, इतिहासकार, विचारवंत यांनी सावरकर यांच्याबद्दल काय म्हटले आहे, हेसुद्धा पाहावे. भारतीय जनता पक्षाचे नेते अरुण शौरी हे अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारमध्ये मंत्री होते. त्यांनी सावरकर यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकात काय म्हटले आहे, तेही त्यांनी पाहावे, असे हर्षवर्षन सपकाळ यांनी म्हटले आहे.

NCP Sharad Pawar : २५ वर्षे शरद पवारांसाठी कामे केले, आता अचानक काय झाले?

एकट्या राहुल गांधींवर टीका करून त्यांना धमक्या देऊन काहीही साध्य होणार नाही आहे. अशा धमक्यांना काँग्रेस पक्ष भीक घालत नाही. राहुल गांधी यांच्यासाठी काँग्रेसचा एक – एक कार्यकर्ता भक्कमपणे उभा आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.