Breaking

Mahayuti Government : रायगड पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच सुटणार !

BJP state president Chandrashekhar Bawankule is confident that the dispute of guardian minister of Raigad will be resolved soon : महायुतीमध्ये सर्वकाही व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी भाजप म्हणून आमची

Nagpur : महायुतीमध्ये कुठल्याही परिस्थितीत ठिणगी पडू नये, हा आमचा प्रयत्न आहे. सर्व काही व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी भाजप म्हणून आमची आहे. त्यासाठी आम्ही पुढाकार घेत आहो. रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा लवकर सुटेल, अशी व्यवस्था मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून ठेवलेली आहे. ते लवकरच रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सोडवतील, असा विश्वास राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

नागपुरात पत्रकारांशी बोलताना महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, कुठलेही वाद चव्हाट्यावर आणून वाढवत बसल्यापेक्षा बसून चर्चेतून सोडवता येतात. त्यासाठी जाहिररीत्या टीका करण्याची गरज नाही. रस्त्यावर जे वाद होतात, ते न करता आपआपल्या नेत्यांशी बोलून सोडवले पाहिजे. मी कुणाला सल्ला देणे योग्य नाही. पण असे वाद कुठल्याही पक्षासाठी चांगले नाहीत. कोणत्याही नेत्याने परिपक्व असले पाहिजे. कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालले पाहिजे.

Purchase and Sale Cooperative Society Election : भाजप-शिवसेनेच्या पाठबळाने विरोधकांचे ‘हेलिकॉप्टर’ कोसळले!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींबाबत विचारले असता, आमची दीड कोटी सदस्यता झाली आहे. संघटनपर्व पूर्ण झालेले आहे. राहिला प्रश्न निवडणुकीचा तर उद्याही निवडणूक असली तरी आम्ही तयार आहोत, महायुती तयार आहे. तसे पाहता सर्वोच्च न्यायालयाचा निकालाचा जो सार आहे, त्याप्रमाणे ऑक्टोबरपर्यंत निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजे. याकरीता लागणारी संपूर्ण संसाधने निवडणूक आयोगाने राज्य सरकारला उपलब्ध करून दिली पाहिजे, असे बावनकुळे म्हणाले.

Local Body Elections : युती-आघाडीचं लक्ष ओबीसी समाजावर!

ऑक्टोबरपर्यंत निवडणुका झाल्या पाहिजे. कारण या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. सध्या खाली अस्वस्थता आहे. १३ हजार पदे रिक्त आहेत. निवडणुका झाल्यावर १३ हजार नवीन नेतृत्व महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांतून तयार होतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्याशिवाय स्थानिक विकास होऊ शकत नाही. म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्था या एकत्रिपणे चालवल्या पाहिजे, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.