Breaking

Collector Office : आता लोक केंद्रांवर नाही, तर सेतू केंद्र गावांत जातील !

Now people will not go to the centers, the Setu Kendra will go to villages, said Chandrashekhar Bawankule : लोकांना जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्याची गरज पडणार नाही

Nagpur : सद्यस्थितीत विविध दाखले घेण्यासाठी लोकांना सेतू केंद्रांवर, जिल्हाधिकारी कार्यालयात जावे लागते. पण यापुढे असे होणार नाही. कारण आम्ही बसेस तयार करू. त्यामध्ये सेतू केंद्राचे पूर्ण सेटअप असेल. या बसेस गावागावांत जातील. जात प्रमाणपत्रापासून ते जन्म-मृत्यूचे दाखलेही तेथून देण्यात येतील, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

महसूल मंत्री बावनकुळे यांनी काल पत्रकारांशी संवाद साधला, ते म्हणाले, या नवीन उपक्रमामुळे संपत्तीचे वाद थांबतील. लोकांना त्यांच्याच गावात सर्व दाखले मिळतील. त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्याची गरज पडणार नाही. रुग्णांसाठीही भरीव काम सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहायता कक्ष अधिक सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. आता विभाग पातळीवर सहायता कक्ष सक्षम करण्याचे काम सुरू आहे. रुग्णांची हेळसांड होणार नाही. केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजना रुग्णांना मिळतील.

Sant Gajanan Maharaj : पाऊले चालती पंढरीची वाट! ७२५ किमीचा ३३ दिवसांचा भक्तिप्रवास

महसूल खात्यात आणखी डझनभर निर्णय होणार आहेत. त्यासाठी काम सुरू झाले आहे. महसूल खाते आणखी आधुनिक आणि लोकाभिमुख करण्यासाठी सुधारणा करणार आहोत. भविष्यात महाराष्ट्राचा महसूल विभाग हा देशातील प्रमुख विभाग ठरेल, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

Mahayuti Government : रायगड पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच सुटणार !

भाजपमध्ये मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश सुरू आहेत. यासंदर्भात विचारले असता, सावनेर तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आमच्या पक्षात प्रवेश केला आहे. भिवापूरमध्ये १७ सदस्य निवडून आले, त्यांचा सत्कार झाला. फडणवीस सरकारवर लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढतो आहे. नुकसान भरपाईबद्दल प्रश्न विचारला असता, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अमरावती, नागपूरसह महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांना दिल्या आहेत, असे महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.