व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Bakri Eid festival : नमस्कार करणे हे आमचे संस्कार !

Bakri Eid festival : नमस्कार करणे हे आमचे संस्कार !

Pyare Khan’s humble reply to Nitesh Rane : गडकरी, फडणवीसांसोबत राहतो, त्यामुळे मी संस्कारी

Nagpur : राज्याचे मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे यांनी इको फ्रेंडली बकरी ईद साजरी करण्यासंदर्भात वक्तव्य केल्यानंतर राजकारण पेटले. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी राणे यांना नोटीस देण्याची भाषा करत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करत असल्याचा आरोप केला. त्यावर प्यारे खान असे बोलतात, पण माझ्यासमोर आले की हात जोडून उभे राहतात, असा हल्लाबोल नितेश राणे यांनी केला. त्यावर प्यारे खान यांनी आज (ता. ५ जून) उत्तर दिले आहे.

नागपुरात आज यासंदर्भात प्यारे खान यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राणे यांनी म्हटले की, मी त्यांना हात जोडून नमस्कार करतो. हे खरे आहे. कारण कुणीही समोर आले की त्यांना हात जोडून नमस्कार करणे, हे आमचे संस्कार आहेत. मित्रांना भेटल्यावर आपण असे करतोच. त्यातल्या त्यात मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राहतो. त्यामुळे मी संस्कारी आहे.

Maha Politics : नितेश राणे आपल्या वक्तव्यावर ठाम; म्हणाले, ईद इको फ्रेंडलीच झाली पाहिजे !

मी चिडलो यासाठी की नितेश राणे देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतात. त्यामुळे त्यांचे नाव खराब करण्याचा कुणी प्रयत्न करत असेल, तर त्याला उत्तर निश्चितच मिळेल. आम्हाला त्यांच्या सल्ल्याची गरज नाही. येथे सरकार आहे, जे येथे राहतात, त्यांनी कायद्याचे पालन करावे आणि केवळ मुस्लीम समाजाचेच लोक नॉनव्हेज खातात असे नाही, तर सगळ्याच समाजाचे लोक नॉनव्हेज खातात. त्यामुळे नितेश राणे यांनी जरा अभ्यास करून बोलावं, असे प्यारे खान म्हणाले.

Forest Department : वनमंत्री गणेश नाईकांना राजकारणावर बोलायचं नाही !

इस्लामचे कन्सेप्ट क्लिअर आहेत. इस्लाममध्ये कधीही कुणावर जबरदस्ती केली जात नाही. व्हर्च्युअल ईद साजरी करण्यासाठी आम्ही तयार आहोत. मात्र कुणावर दबाव टाकणे योग्य नाही. काय करायचे, ते मुस्लीम धर्मीय जाणतात. आमच्या समाजाच्या पद्धती काय आहेत, ते आम्हाला माहिती आहे. हे त्यांनी सांगायची गरज नाही. कधी कोणत्याही मुस्लीमाने होळी किंवा दिवाळीबाबत काही बोलले असेल तर सांगा. मुस्लीमांनी कधीही कुणाच्या सणांवर टीका टिप्पणी केली नाही, असेही प्यारे खान यांनी सांगितले.

error: Content is protected !!