व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Superintendent of Police Archit Chandak : “भाईगिरी बंद करा, नाहीतर परिणाम भोगायला...

Superintendent of Police Archit Chandak : “भाईगिरी बंद करा, नाहीतर परिणाम भोगायला तयार राहा!”

warns to stop illegal activities : पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी शांतता समितीच्या बैठकीतच भरला दम

Akola “मी आता अकोल्यात आलो आहे. इथून पुढे कोणत्याही प्रकारची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. तुमची पंधरा मिनिटांची मस्ती पुढील अनेक वर्षे पश्चात्ताप घडवू शकते,” अशा ठाम शब्दांत जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी अकोला जिल्ह्यातील असामाजिक प्रवृत्तींना इशारा दिला. “भाईगिरी बंद करा, अन्यथा परिणाम भोगण्यास तयार राहा” असा सज्जड दम देत त्यांनी आगामी धोरण स्पष्ट केले.

शहरातील स्थानिक पोलिस मुख्यालयाच्या लॉनमध्ये बुधवार, ४ जून रोजी आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानी बोलत होते. या वेळी त्यांनी जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर खुलेपणाने मत व्यक्त करत आगामी कृती आराखडा मांडला.

Local Body Elections : प्रभाग रचनेचा निर्णय होईना, इच्छुकांचा जीव टांगणीला!

पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, सध्या शहरातील सुमारे ७० टक्के तक्रारी वाहतूक व्यवस्थेशी संबंधित आहेत. लवकरच शिस्तबद्ध आणि सुधारित वाहतूक व्यवस्था नागरिकांना अनुभवता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अतिक्रमण, महिलांची छेडछाड, सोशल मीडियाचा गैरवापर आणि धार्मिक भावना भडकावणाऱ्या कृतींवर प्रभावी कारवाई केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. या विषयांवर शांतता समिती सदस्यांनी लक्ष वेधल्यानंतर त्यांनी ठोस उपाययोजनांची ग्वाही दिली.

Maha Politics : आदित्यने आपले ठाकरे हे आडनाव बदलवून घ्यावे !

येणाऱ्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाने शांततेत आणि सामाजिक सलोख्याने सण साजरा करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक चांडक यांनी केले. “कोणत्याही धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची सर्वांनी दक्षता घ्यावी,” असेही त्यांनी अधोरेखित केले. शांतता समिती सदस्यांना प्रत्येक पोलिस ठाण्यांत आदराने वागणूक दिली जाईल, असे स्पष्ट करत, प्रशासन त्यांच्या सूचनांचा गांभीर्याने विचार करेल, असा विश्वास चांडक यांनी दिला.

error: Content is protected !!