Breaking

Bacchu Kadu : बच्चू कडू यांचे आता ‘अन्नत्याग आंदोलन’!

Protests will be held for various demands of farmers : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जनआंदोलन करण्याची घोषणा

Amravati शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी लढा उभारणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाने पुकारलेल्या ‘अन्नत्यान आंदोलना’ला ८ जून (रविवार) पासून अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी (ता. तिवसा) येथे औपचारिक सुरुवात होत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळी हे आंदोलन सुरू होणार आहे. विदर्भातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याची माहिती पक्षाचे कार्याध्यक्ष बल्लू जवंजाळ यांनी दिली.

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी. शेतीमालाला हमीभावावर (MSP) २० टक्के अतिरिक्त अनुदान मिळावे. शेतकऱ्यांच्या या जीवनमरणाच्या मुद्द्यांवर केंद्र व राज्य शासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी संघटनेची भूमिका आहे. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू होणार आहे. याला विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी पाठिंबा देत आहेत.

Local Body Elections : अधिसूचनेची प्रतीक्षा; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष?

“चला मोझरी! चला मोझरी!” या घोषणेने संपूर्ण विदर्भात जनजागृती केली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिरावलेले नाही, उत्पादन खर्च वाढत आहे, तर हमीभावाच्या यंत्रणाही अपुऱ्या पडत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Mangal Prabhat Lodha : तंत्रकुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी आयटीआयचे अद्यावतीकरण गरजेचे

गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महासमाधी परिसरात हे उपोषण शांततेच्या मार्गाने पार पडणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे प्रयत्न असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. या आंदोलनासाठी मोझरी येथे राष्ट्रसंतांच्या समाधी परिसरात जय्यत तयारी करण्यात आली आहे.