Social Justice Department gets hit again :सामाजिक न्याय विभागाला पुन्हा फटका, लाडक्या बहिणीसाठी निधी वळवला
मुंबई : राज्यात विविध विभागाचे निधी वळवण्याचे सत्र सुरूच असून वेगवेगळ्या विभागाचे मंत्री त्रस्त झाले आहेत. लाडक्या बहीण योजनेच्या हप्त्याची जुळवा जुळव करताना सरकारची दमछाक होत आहे. सामाजिक न्याय विभागाला या प्रकाराचा पुन्हा फटका, बसला असून नाराजीचे सूर उमटत आहेत.
निधीच्या पूर्ततेवरून सध्या सरकारची धावपळ सुरू असून त्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनां मुळे अनेक खात्यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यांच्या निधीवर थेट डल्ला मारत असल्याने संबंधित विभाग आणि मंत्रालयात नाराजी पसरत आहे. आमच्या खात्यांचा हक्काचा निधी वळवण्यात येत असल्याच्या तक्रारी समोर समोर येत आहेत.
निधी वळवण्याच्या प्रक्रियेचा सर्वाधिक फटका सामाजिक न्याय विभागाला बसत आहे. ‘लाडकी बहीण’साठी सामाजिक न्याय विभागाचा 410.30 कोटींचा निधी वळवल्याचे समोर आले आहे.
सामाजिक न्याय विभागातील अनुसूचित जाती घटकांसाठीचा निधी वळवण्यात आला आहे. सामाजिक न्याय विभागाला गेल्या 5 वर्षांच्या तुलनेत यावर्षी 7,317 कोटी रुपयांच्या निधीची तूट असल्याचे सांगितले जात आहे.
सामाजिक न्याय विभागाचा निधी सलग दुसर्यांदा वळवण्यात आला. या विभागाचा निधी यापूर्वीही वळवण्यात आला होता. आताही तोच प्रकार समोर आला आहे. या खात्याचे मंत्री आणि शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी निधी वळवल्या प्रकरणी नाराजी व्यक्त केली होती. आता पुन्हा निधी वळवल्याने नाराजी आणखीच वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सामाजिक न्याय तसेच आदिवासी या दोन विभागाचा 1,827 कोटी 70 लाख कोटींचा निधी महिला व बाल विकास खात्याकडे वळवण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेत निधीची तरतूद करताना राज्य सरकारची दमछाक होत असल्याची टीका होऊ लागली आहे . त्यामुळे इतर खात्यासाठीच्या निधीला कात्री लागल्याचे समोर येत असून विरोधकही त्यावर निशाणा साधत आहेत.
RBI Repo Rate : आता खुशाल काढा कर्ज! कार, घराचा ईएमआय होणार कमी
#LadkiBahin #SocialJusticeDepartment #fundsdivert #maharashtra #Maharashtra state #लाडकीबहीण #सामाजिकन्यायविभाग #आदिवासीविभाग #महाराष्ट्रशासन #महाराष्ट्र