Former Congress Minister Siddaram Mhetre joins Shiv Sena : उपमुख्यमंत्री शिंदेंचा उबाठाला टोला; काँग्रेसचे माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे शिवसेनेत
अक्कलकोट, सोलापूर : आज शिवसेनेचे ६० आमदार आहेत. एक दिवस असा येईल की विरोधकांचे सगळे तंबू रिकामे होतील. असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला लगावला आहे. राज्याचे माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे आणि त्यांचे बंधु शंकर म्हेत्रे यांनी शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला, यावेळी ते बोलत होते.
अक्कलकोट येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत हा प्रवेश सोहळा पार पडला यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, तीन वर्षांपूर्वी जेव्हा बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड झाली, तेव्हा आम्ही सत्ता सोडली आणि राज्याने एक मोठा उठाव पाहिला. बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही ते पाऊल उचलले. केवळ भारताच नव्हे तर जगातील ३३ देशांनी या उठावाची दखल घेतली. जनतेनेही या उठावाला प्रतिसाद दिला. आज शिवसेनेचे ६० आमदार आहेत. एक दिवस असा येईल की विरोधकांचे सगळे तंबू रिकामे होतील. आधीचे सरकार स्थगिती सरकार होते आताचे सरकार प्रगतीचे सरकार आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.
Ladki Bahin : राज्यात विविध विभागाचे निधी वळवण्याचे सत्र सुरूच
सिध्दाराम म्हेत्रे आणि त्यांचे बंधु शंकर म्हेत्रे ही राम लक्ष्मणाची जोडी आहे. म्हेत्रे परिवाराला मोठी सामाजिक पार्श्वभूमी आहे. त्यांचे वडिल सातलिंग्गपा म्हेत्रे इथलं मोठं प्रस्थ होतं. म्हेत्रे परिवाराने कधी जात धर्म पक्ष पाहिला नाही, आलेल्या माणसाचे काम केले. त्यामुळे इथल्या हिंदु मुस्लिम बांधवांचा म्हेत्रे परिवाराला कायम पाठिंबा राहिला आहे. अनेक लोक वडिलांच्या नावावर फुशारक्या मारतात, मात्र सिध्दारामजी यांनी कधीही बढाया मारल्या नाहीत, ते कायम जमीनीवर राहिले. कार्यकर्त्यांचा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. जिथे दिशा नाही तिथे दशा झाली, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काँग्रेसवर केली.
यावेळी मंत्री दादा भुसे, मंत्री संजय राठोड, विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे उपस्थित होत्या.nसर्वसामान्यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणण्याचे काम आम्ही करतोय, केंद्र आणि राज्यात डबल इंजिन सरकार आहे. विरोधकांनी कितीही अपप्रचार केला तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक यानुसार काम करायचे आहे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केले.
सभेसाठी तब्बल ११ तास प्रतिक्षा करणाऱ्या जनतेपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यावेळी नतमस्तक झाले. ते म्हणाले की आज दुपारी नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचे उद्घाटन करुन मंत्री दादा भुसेंसह नाशिक येथे हॅलिकॉप्टरने पोहोचलो. मात्र हवामान खराब असल्यामुळे सोलापूर विमानतळावर विमान उतरु शकत नाही, असा संदेश मिळाला. त्यानंतर कार्यक्रम रद्द करावा, असे सुचवण्यात आले, मात्र स्वामी समर्थांची नगरी अक्कलकोट येथे पोहोचणारच, असा निश्चय केला होता. मात्र केंद्रीय मंत्री राम नायडू यांना विनंती करुन गुलबर्गा विमानतळावर विमानाच्या लॅंडिंगची परवानगी घेतली. सिध्दारामांना आणि तुम्हाला भेटण्याची इच्छाशक्ती प्रबळ होती म्हणून इथवर पोहोचलो, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
#DCM Shindeagainst UBT #Former Congress Minister joins Shiv Sena #Siddaram Mhetre joins Shiv Sena #उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे #उबठा विरोधात शिंदे #काँग्रेसचे माजीमंत्री शिवसेनेत #सिध्दाराम म्हेत्रे #सिध्दाराम म्हेत्रे शिवसेनेत