Environment conducive to swine flu, health department’s concerns increased : नागपूर जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा एक मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर
Nagpur : सन २०२० मध्ये एका विषाणुचा शिरकाव झाला. अन् देशभर हाहाकार उडाला. एकापाठोपाठ एक राज्यांमध्ये लॉकडाऊन होऊ लागले. अखेरीस देशभर लॉकडाऊनची घोषणा केंद्र सरकारने केली. कोरोनाशी दोन हात करताना काय कसरत झाली, हे ज्याचे त्यालाच माहिती आहे. आता हा विषाणू पुन्हा जोर धरू पाहतोय. परिणामी आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.
महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये कोरोनाचे दोन बळी गेले. त्यानंतर स्वाईन फ्लूसुद्धा डोके वर काढत असल्याचे संकेत मिळत आहेत. नागपुरात स्वाईन फ्लूने एक रुग्ण दगावलेला आहे. हा ६० वर्षीय व्यक्ती सावनेरचा असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याला स्वाईन फ्लू सदृश लक्षणे होती. त्यामुळे त्याच्यावर स्थानिक रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले. पण त्रास वाढल्याने नंतर त्याचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा एक मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. शासकीय रुग्णालये दक्ष झाली आहेत.
Maha Politics : आमच्या आमदारांच्या भरवशावर ‘ते’ खासदार झाले !
या वर्षातील स्वाईन फ्लूचा नागपुरातील हा पहिला मृत्यू आहे. आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार पूर्व विदर्भात या आजाराचे कालपर्यंत (५ जून) २७ रुग्ण आढळले. सर्वाधिक १४ रुग्ण हे केवळ नागपूर शहरातील आहेत. ग्रामीणमधील सहा रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. पूर्व विदर्भातील जिल्ह्यांची आकडेवारी घेतल्यास गोंदिया जिल्ह्यात एक रुग्ण, चंद्रपूर जिल्ह्यात तीन, भंडारा जिल्ह्यात एक तर गडचिरोली जिल्ह्यात एका रुग्णाची नोंद झालेली आहे. यांतील बव्हंशी रुग्ण मे महिन्यात आढळले आहेत.
Harshvardhan sapkal : ‘त्या’ प्रवृत्तींचा आता कडेलोट करा, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची मागणी
पूर्व विदर्भात सद्यस्थितीत उन्ह – पावसाचा खेळ सुरू आहे आणि तज्ज्ञांच्या माहितीनुसार हे वातावरण स्वाईन फ्लूसाठी पोषक आहे. यापुढे स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण वाढण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तवली जात आहे. एच वन, एन टू अथवा स्वाईन फ्लूच्या आजारात रुग्णाला ताप, खोकला, घशाचा संसर्ग, डोकेदुखी आदी लक्षणे आढळल्यास अशा लोकांना त्वरीत रुग्णालयात दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.