Shiv Sena march at Yewati police station in Buldhana district : पोलिसांच्या दुर्लक्षाने संतापले नागरिक
Buldhana : बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील येवती या गावात अवैध दारूचा व्यवसाय खुलेआम सुरू आहे. यामुळे लोकांच्या जिवाला धोका निर्णाण झाला असून घरेच्या घरे उद्धवस्त होत आहेत. या दारूमुळे पुरूषांनी तर जीव गमावलेच आहेत. पण काही महिलांनीही आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. धक्कादायक म्हणजे पोलिसांनी या अवैध व्यवसायाकडे साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नागरिक आता आक्रमक झाले आहेत.
गावकऱ्यांनी यासंदर्भात तक्रारी केल्या. त्याची दखल शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) घेतली असून आक्रमक आंदोलन केले. जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे यांच्या नेतृत्वात सरपंच, उपसरपंच, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष यांच्यासह शेकडो पुरूष, महिलांनी लोणार पोलिस स्टेशनवर धडक दिली. अवैध दारूचे व्यवसाय बंद करण्याची मागणी लाऊन धरत तसे निवेदन दिले.
Local Body Election : मिशन इलेक्शन : प्रतीक्षा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची !
गेल्या दोन वर्षांपासून येवतीसह आजुबाजुच्या गावांमध्ये अवैध दारूची विक्री खुलेआम सुरू आहे. त्यामुळे अनेक लोक दारूच्या आहारी गेले असून गावातील घरेच्या घरे उद्धवस्त झाली आहेत. तरीही पोलिस दुर्लक्ष करत असल्यामुले ग्रामस्थ चिडलेले आहेत. एल्गार मोर्चाच्या माध्यमातून गावातील सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी अवैध दारूच्या अड्ड्यांवर तातडीने छापे टाकून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी महिलांनीही आवाज बुलंद केला आहे.
Students are stressed : लिपिक – टंकलेखक : दोन वर्षांनंतरही निवड नाही, विद्यार्थी तणावात !
पोलिस स्टेशनवर काढण्यात आलेल्या मोर्चात डॉ. गोपाल बछिरे यांच्यासह तालुका प्रमुख अॅड. दीपक मापारी, शहरप्रमुख गजानन जाधव, लूकमान कुरेशी, तानाची मापारी, श्रीकांत मादनकर, अशपाक खान, प्रयागबाई पाटोळे, गोदावरी कायंदे, रामेश्वर कायंदे, गजानन शिंदे. ज्योती सरकटे, कुसुम टाकसाळकर, कलीम कुरेशी, मंगेश मोरे आदी सहभागी झाले होते.