Nagpur APMC : रातोरात तब्बल ५१ बकरी दलालांच्या परवान्यांचे नुतनीकरण !

BJP MLA Krishna Khopde exposed major corruption : घोटाळ्यातील सहभागी अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

Nagpur : नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक कार्यकाळ राहिलेला माजी सचिव राजेश भुसारीने भ्रष्टाचाराचा कळस गाठला. त्याने या भ्रष्टाचाराची पाळेमुळे अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत खोलवर रुजवली. त्याने रातोरात तब्बल ५१ बकरी दलालांच्या परवान्याचे नुतनीकरणे केले, असा दावा पूर्व नागपूरचे आमदार कृष्षा खोपडे यांनी करून या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केली होती.

या घोटाळ्यात राजेश भुसारीसोबत ज्या – ज्या अधिकाऱ्यांचा समावेश असे, त्या सर्वांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, असे निर्देश आमदार खोपडे यांच्या मागणीवरून देण्यात आले आहेत. आमदार खोडपे यांना यासाठी मोठा लढा दिलेला आहे. राज्य शासनाने नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बकरा मंडीतील काही दलालांचे परवाने रद्द केले आहेत. या मंडीतून मिळणाऱ्या महसुलात ४० कोटींहून अधिक भ्रष्टाचार झाल्याचा खोपडेंचा आरोप होता.

Alcohol addiction : दारूचे व्यसन पुरूषांना, जीव गमवावा लागला महिलांना !

आमदार खोपडे यांनी हा भ्रष्टाचार उजागर केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने २०२० मध्ये एक सदस्यीय खंडागले समिती गठीत केली होती. या प्रकाराची सखोल चौकशी करण्याचे आदेश पणन संचालकांना दिले होते. माजी सचिव राजेश भुसारीने बाजार समितीमध्ये केलेल्या भ्रष्टाचारातील शासनाचा महसूल नेते आणि संचालक मंडळाच्या घशात टाकला असल्याचाही आरोप आमदार खोपडे यांनी केला होता. समितीने चौकशी करून तसा अहवाल शासनाला दिला. त्यानंतर उपरोक्त कारवाई करण्यात आली.

Local Body Election : मिशन इलेक्शन : प्रतीक्षा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची !

बाजार समितीच्या संचालक मंडळाने भ्रष्टाचाराचा इतिहास निर्माण केला. दलाल, आडतियांच्या कामातही भ्रष्टाचार दिसून येतो. बकरा मंडीचा शासनाला मिळणारा महसूल स्वतःच्या खिशात टाकला. काही दलालांचे परवाने निलंबित केल्यानंतर आता बाजार समितीवर प्रशासक बसवण्याची आणि सर्व दोषींवर कारवाई करण्याची प्रक्रिया शासन स्तरावर सुरू होईल, असे आमदार खोपडे यांनी सांगितले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सचिव येडलेवार यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पण बराच काळ लोटूनसुद्धा त्यांच्यावर कारवाई झाली नसल्याचेही आमदार खोपडे यांनी सांगितले.