Harshwardhan Sapkal : भाजप म्हणजे नेते खाणारी चेटकीण, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची टीका

Congress state president criticizes Modi government’s 11-year tenure : ११ वर्षांत अदानी, अंबानींची संपत्ती किती वाढली, याचा लेखाजोखा देण्याचे आव्हान

Nagpur मोदी सरकारच्या ११ वर्षांचा लेखाजोखा मांडण्याचे निर्देश सर्व खासदार व मंत्र्यांना देण्यात आले आहेत. जिल्हा पातळ्यांवर पत्रकार परिषदांच्या माध्यमातून जोरदार मोहीम सुरू झाली आहे. यामध्ये गेल्या ११ वर्षांमध्ये अदानी-अंबानींची संपत्ती कितीपटींनी वाढली, याचीही माहिती देण्याचे आव्हान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपला दिले आहे. त्याचवेळी भाजप म्हणजे काँग्रेसचे नेते खाणारी चेटकीण असल्याची टीकाही त्यांनी केली. सोमवार, दि. ९ जूनला ते नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते.

मोदी सरकारने ११ वर्षांत देशाला रसातळाला नेण्याचेच काम केले आहे. सरकारने ११ वर्षांतील कामाचा लेखाजोखा सादर करावा. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या संघटनांच्या वतीने रेकॉर्ड मांडावा. हॅपी इंडेस्क, बेरोजगारी, गरीबी, शेतकरी उत्पन्न, स्वामीनाथन आयोग, स्मार्ट सिटी, या पलीकडे जाऊन प्रत्येक माणसाच्या खिशात १५ लाख देणार देणार होते, त्याचे काय झाले हे सांगावे. तसेच अदानी-अंबानी यांच्या संपत्तीत किती पटींनी वाढ झाली, हेही सांगावे, अशी मागणीही सपकाळ यांनी केली.

Harshvardhan sapkal : ‘त्या’ प्रवृत्तींचा आता कडेलोट करा, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची मागणी

महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढणार की स्वतंत्रपणे लढणार, याबाबत सगळे मिळून निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबई लोकल अपघाताला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार आहे. मृतकांच्या परिवाराला प्रत्येकी २५ लाख रुपये मदत करावी, मृतकांच्या कुटुंबातील एकाला सरकारने नोकरी द्यावी. याची जबाबदारी स्वीकारात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सपकाळ यांनी केली.

Mahayuti Government : आता अदानीला फक्त मंत्रालय देणे बाकी, तेही देऊन टाका ना..!

भाजप म्हणजे चेटकीण
भीती दाखवून आणि आमिष देऊन बऱ्याच नेत्यांना महायुतीमध्ये ओढले जात आहे. भाजप ही काँग्रेसचे नेते खाणारी चेटकीण आहे. ‘काँग्रेसमुक्त भारत’ म्हणणाऱ्यांवर आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’ म्हणण्याची वेळ आली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.