Raja’s sister faces online backlash for sharing reels : भावाच्या मृत्यूवर पैसे कमावतेय? राजा रघुवंशीच्या बहिणीवर संतापले नेटकरी
Indore : राजा रघुवंशी या तरुणाची हत्या केली. सोशल मीडियावर हा विषय खूपच गाजत आहे. या सगळ्या प्रकारात राजाची धाकटी बहीण श्रास्ती रघुवंशी हिच्या इंस्टा अकाऊंटला भेट देणाऱ्यांचा देखील ओघ वाढला. त्यावर तिने एका वाहनाची व मसाज पार्लरची जाहिरात झळकवून पैसे कमावल्याचे समोर आले आहे. त्या नंतर “मोठया भावाच्या पादुकांना सिंहासनावर ठेवून राज्य कारभार करणाऱ्या ‘रघुच्या वंशात’ ही कीड कुठून जन्माला आली? असे प्रश्न करत नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
एका नेटकऱ्याने म्हणले आहे की, माझ्या निदर्शनास आलेला प्रकार म्हणजे राजा रघुवंशीच्या बेपत्ता होण्याचा विषय सोशल मीडियावर रंगला, तसे अनेकांनी इन्स्टा, फेसबुकवर या कुटूंबाला शोधण्याचा प्रयत्न केला. त्यात या राजाची धाकटी बहीण श्रास्ती रघुवंशी हिच्या इन्स्टा अकाऊंटला भेट देणाऱ्यांचा देखील ओघ वाढला. या अकाउंटवरून सुरवातीला तिने भाऊ बेपत्ता झाल्याच्या रिल्स टाकल्या व लोक प्रतीसाद देत आहेत हे बघताच तीने एका वाहनाची व मसाज पार्लरची जाहिरात झळकवून पैसे कमावल्याचे दिसून येत आहे. मोठया भावाच्या पादुकांना सिंहासनावर ठेवून राज्य कारभार करणाऱ्या रघुच्या वंशात ही कीड कुठून जन्माला आली ? यावर काय व्यक्त करावे तेच मला कळेना झाले आहे.
Raghuvanshi Murder Case : सोनमच्या लग्नात ढसाढसा रडला होता नोकर!
राजा रघुवंशीच्या निधनानंतर त्याची बहिण सोशल मीडियावर प्रमोशनल रिल्स शेअर करताना दिसली. तसेच ती भावाच्या निधनाचे भांडवल करत असल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे. राजा रघुवंशी याच्या खुनाच्या प्रकरणात खुनाचा आरोप त्याची पत्नी सोनम रघुवंशीवरच लावण्यात आला आहे. तिने कट रचून हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. तिने त्यासाठी 4 जाणांना नेमलं होतं. या कटात सोनमचा एक्स बॉयफ्रेंड राज कुशवाहासह इतर काही लोकांनाही अटक करण्यात आली आहे. सध्या तपास सुरू आहे आणि या प्रकरणाने अनेकांना धक्का बसला आहे.
Raja Raghuvanshi murder case : ‘सोनम’ बेवफा! ‘राजा’सोबत हनिमूनला गेली; जीव अडकला नोकरामध्ये!
दरम्यान, सोशल मीडियावर एका रडणाऱ्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात ती मुलगी म्हणते, “आवडत नव्हता तर मारलं कशाला, पळून गेली असतीस.” खरंतर हा व्हिडिओ राजा रघुवंशीच्या बहिणीचा आहे. तिचा हा व्हिडीओपाहून लोक तिला ट्रोल करताना दिसत आहेत. राजाची बहीण सृष्टी रघुवंशी ही समाज माध्यमावर सक्रिय असते. ती एक इन्फ्लूएन्सर आहे. तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. तिने प्रोमोशनसाठी तिच्या बायोमध्ये तसे लिहिलं आहे. तिने भावाच्या निधनानंतर देखील काही प्रमोशनल व्हिडीओ शेअर केले. ते व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.
Raja Raghuvanshi Murder : हनिमूनला गेल्यावर नववधूनेच रचला नवऱ्याच्या हत्येचा कट!
भावाचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर, तिने सोनम विरुद्ध कारवाईची मागणी केली. मात्र, अनेक लोक सृष्टीच्या व्हिडीओवर कमेंट करुन टीका करत आहेत. एका यूजरने ‘लाज वाटली पाहिजे भावाच्या मृच्यूवर व्ह्यूवर्स मिळवते. असे करुन पैसे कमातेय का?’ अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘हिचा भाऊ मेलाय आणि बहिणीला सोशल मीडियावर यूजर्स आणि व्ह्यूवर्स हवेत… लाज वाटत नाही का?’ या शब्दात सुनावले आहे.