व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Shahrukh Encounter : पुण्यातील सराईत गुंड शाहरूखचा एन्काऊंटरमध्ये सोलापूरात खात्मा

Shahrukh Encounter : पुण्यातील सराईत गुंड शाहरूखचा एन्काऊंटरमध्ये सोलापूरात खात्मा

Pune gangster Shahrukh killed in Solapur, encounter : पुण्यासह परिसरात अनेक गुन्हे मात्र कुटुंबीयांचा पोलिस कारवाईवर आक्षेप

Solapur : पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापूरात पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख वय 23 असे या सराईत गुंडाचे नाव आहे. त्याच्यावर पुण्यासह परिसरात अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिस त्याच्या मागावर होते. तो गेल्या काही दिवसांपासून सोलापूरात लपल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये हा फरार आरोपी ठार झाला. या घटनेने पुण्यातील गुंडांमध्ये दहशत पसरली असून पुण्यातील स्वयंघोषीत दादा, भाऊ सध्या अंडरग्राऊंड झाल्याचे समजते.

शाहरूख शेखवर पुणे पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत. तो सराईत गुन्हेगार होता. काही प्रकरणात तो पोलिसांना हवा होता. पोलीस त्याच्या शोधात होते. काही दिवापासून तो सोलापुरातील लांबोटी गावाजवळ लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याला अटक करण्यासाठी पुणे गुन्हे शाखेचे पथक मध्यरात्री लांबोटी येथे आले होते. तो लपलेल्या घरावर पोलिसांनी छापा मारताच आरोपी शाहरुख शेख यांने पोलिसांवर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या गोळीबारला प्रत्युत्तर देताना शाहरुख उर्फ अट्टी शेख गंभीर जखमी झाला.

School ID scam : दोषी शिक्षकांवर कारवाई करा, पण इतरांचा पगार का थांबवला ?

गंभीर अवस्थेत आरोपी शाहरुखला सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. शाहरूख हा मोकोका गुन्ह्यातील फरार आरोपी आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलीस त्याचा कसून शोध घेत होते. पण तो सारखा गुंगारा देत होता. जीवाच्या भीतीने त्याने सोलापूर गाठले होते. पण त्याच्या कारवाया थांबत नव्हत्या. त्याचा काही गुन्ह्यात हात असल्याचे समोर आले होते. तो मोहोळ जवळील लांबोटी येथे लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक सोलापूरात दाखल झाले होते.

भल्या पहाटे पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी कारवाई सुरू केली. पोलिस आल्याची भनक लागताच शाहरूखने पोलिसांवर गोळीबार केला. त्याला शरण येण्याची संधी देण्यात आली. पण त्याने गोळीबार केला. प्रत्युत्तरात शाहरूख गंभार जखमी झाला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पहाटे साडेतीन वाजता ही कारवाई करण्यात आली.

माझ्या मुलावर खोटा गुन्हा दाखल केला, गोळीबार केलेला नसताना देखील पोलिसांनी इन्काउंटर केला. असा दावा कुख्यात गुंड शाहरुख शेखचे वडील रहिम शेख आणि पत्नी नफिसा हिने केला आहे. पहाटे साडेतीन वाजता 10-12 पोलीस थेट घरात घुसले. शाहरुखने पोलिसांना घरात येऊ नका म्हणून सांगितलं. त्याच्याकडे पिस्टल होती पण त्याने गोळी चालवली नाही, पोलिसांनीच घरात घुसताच थेट गोळी चालवली, असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला.

Gold Rate : इराण-इस्त्रायल युद्ध भडकले, सोन्याने गाठला लाखाचा टप्पा

पोलिसांनी चार गोळ्या चालवल्याचा दावा त्याच्या पत्नीने केला. तर माझा मुलगा किरकोळ गुन्हेगार होता, इन्काउंटर करण्या इतका कुख्यात गुंड नव्हता. त्याच्यावर काही गुन्हे दाखल होते पण बांबूने मारहाण झालेल्या प्रकरणात त्याच्यावर खोटा मकोका लावण्यात आला आहे. तो कामाला लागला होता मात्र पोलिसांनी त्याला आरोपी केला, पुण्याच्या काळेपडळ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गुंड शाहरुखच्या वडिलांनी केली आहे.

error: Content is protected !!