व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Pandharpur Darshan : अवघ्या एक तासात होणार आता विठुरायाचे दर्शन

Pandharpur Darshan : अवघ्या एक तासात होणार आता विठुरायाचे दर्शन

Token darshan on the lines of Tirupati Balaji in Pandharpur : पंढरपुरात तिरुपती बालाजीच्या धर्तीवर टोकन दर्शन

Pandharpur : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर यात्रा सुरू झाली आहे विविध ठिकाणाहून पालख्या विठू माऊलीच्या दर्शनासाठी निघाल्या आहेत. विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगेत तीन ते सात तासांपर्यंत वेळ लागत होता. तर आषाढी यात्रा काळात भाविकांना दर्शनासाठी ३० तासापर्यंत उभं राहून माऊलीच्या प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र तिरुपतीच्या टोकन पद्धत सुरू करण्यात आली आहे त्यामुळे दर्शनाची प्रतीक्षा कमी होणार असून तासाभरात दर्शन होऊ शकणार आहे.

विठ्ठलाच्या दर्शनासाठी एरवी भाविकांच्या गर्दी प्रमाणे रांगेत तीन तासांपर्यंत वेळ लागत होता. तर आषाढी यात्रा काळात ३० तासापर्यंत उभं राहून माऊलीच्या दर्शनाची प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र हीच वेळ आता टोकन दर्शनामुळे एक तासावर येणार आहे. दरम्यान ही टोकन प्रणाली कायम ठेवण्याची मागणी भाविकांकडून केली जात आहे. यावर मंदिर समितीकडूनही सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे.

Shahrukh Encounter : पुण्यातील सराईत गुंड शाहरूखचा एन्काऊंटरमध्ये सोलापूरात खात्मा

तिरुपती बालाजी प्रमाणे पंढरपुरात विठ्ठलाचे टोकन दर्शन सुरू झाल्याने एका तासाच्या आतच भाविकांना माऊलीचं दर्शन घडलं आहे. आज १५ जून रोजी सकाळी पावणेदहा वाजता पहिल्या भाविकांला विठ्ठल दर्शनासाठी प्रवेश देण्यात आला. यानंतर पुढील अवघ्या 25 मिनिटात भाविकांचे दर्शन घडले. त्यामुळे टोकन दर्शना सुविधा कायमस्वरूपी असावी, अशी मागणी आता भाविकातून होत आहे. टोकन दर्शन झाल्यानंतर कमी वेळात दर्शन मिळाल्याचा आनंद भाविकांनी व्यक्त केला. तर टोकन दर्शन सुरळीत होत असताना काही त्रुटींचा अभ्यास करून कायमस्वरूपी दर्शन सुरू ठेवण्याचा मानस मंदिर समितीने व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!