Women leaders of Uddhav Thackeray group joins Shinde Sena: उद्धव गटाला आणखी एक धक्का; महिला पदाधिकारी शिवसेनेत दाखल
Buldhana जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच पक्षांमध्ये पक्षांतराचा सिलसिला सुरु झाला आहे. चिखली तालुक्यात उद्धव ठाकरे गटाचा एक मोठा राजकीय खेळखंडोबा झाला असून अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
केंद्रीय मंत्री व बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत मेहकर येथील जनसंपर्क कार्यालयामध्ये १५ जून रोजी पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के, तालुका प्रमुख कवितातााई दांदडे, शहर संघटक किरण हिवाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या पक्षप्रवेशादरम्यान चिखली तालुक्यातील उबाठा गटातील महिला पदाधिकारी व कार्यकर्ते वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांने प्रेरित होवून शिंदे गटाच्या शिवसेनेत सहभागी झाले.
Rashtriya swayamsevak sangh : भाजप नेत्यांच्या अपेक्षा, संघाने दिला सल्ला
पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये कल्पनताई गोविंद बोधेकर (उपजिल्हाप्रमुख), लताताई कैलास शिंदे (उपशहर प्रमुख), द्वारकाबाई संजय भोसले (भाजपाच्या माजी तालुकाप्रमुख), वैशाली संजय घोरपडे, रेखा मिलिंद लव्हाळे, उमा महेश बोधेकर, शीला एकनाथ खरात, मंदा मिलिंद डोंगरदिवे, स्वाती रामा खिल्लारे, ज्योती रवी जाधव, मनसेचे तुकाराम साप्ते, योगेश जाधव, गणेश आवचार व अनिकेत श्रीमंत आदींचा समावेश आहे.
या पक्षांतरांमुळे चिखली व बुलढाणा जिल्ह्यात शिंदे गट अधिक मजबूत झाला आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदेच्या निवडणुकीत त्याचा फायदा मिळण्याचा विश्वास पक्षनेत्यांनी व्यक्त केला आहे.