Leaders unhappy with changes in district heads : खा. श्रीकांत शिंदे घेणार बैठक; निष्ठावान नेत्यांवर अन्यायाची भावना
Amravati विदर्भातील शिंदेसेनेत असंतोष उफाळला असून नियुक्त्यांवरील वाद चिघळला आहे. पक्षाने केलेल्या जिल्हाप्रमुखांच्या बदलांमुळे असंतुष्ट नेत्यांनी पक्षप्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर खा. श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी पक्षनेत्यांची बैठक बोलावली आहे. यामध्ये असंतोष शमविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
अकोला येथे दोन जिल्हाप्रमुख नियुक्त करण्यात आले. माजी आमदार नरेंद्र गव्हाणकर उमाजी जी प सभा होती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्या नियुक्तीनंतर असंतोष अधिकच चिघळला. यात आमदार गोपीकिशन बाजोरिया व श्रीरंग पिंजरकर आणि त्यांचे सहकारी यांच्यात फुट पडल्याचे चित्र समोर आले आहे.
Vanchit Bahujan Aghadi : वंचितच्या अडचणी वाढल्या; पदाधिकाऱ्यांची राजीनाम्याची घोषणा
भंडारा येथे शिंदेसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर हे पक्षाचे पूर्व विदर्भ संयोजक आहेत. त्यांनी चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, गडचिरोली या जिल्ह्यांतील जिल्हाप्रमुख बदलून नवीन नेमणुकीचे आदेश दिले आहेत. राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार कृपाल तुमाने, किरण पांडव यांनी या कारवाईचे आदेश परस्पर दिलेत. त्याचा असंतोष व्यक्त केला आहे.
Vidarbha Farmers : तर राज्यकर्त्यांना आपली घरं सांभाळणे कठीण होईल!
उद्धव ठाकरेंपासून वेगळे होऊन एकनाथ शिंदे यांची साथ देणारे व पूर्वीपासून पक्षाशी निष्ठावान असलेल्या नेत्यांना वगळून, पंधरा दिवसांपूर्वी पक्षात आलेल्या नेत्यांना थेट जिल्हाप्रमुख नेमण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. या बदलांमध्ये आ. भोंडेकर यांनी परस्पर आदेश दिले असण्याचा आरोप असून एक गुन्हेगारी स्वरूपाचा नागपुरातील नेता या बदलांमध्ये प्रभाव टाकत असल्याच्याही तक्रारी आल्या आहेत. नागपूर शहर व ग्रामीण भागातील जिल्हाप्रमुख पदांसाठी शिंदे यांच्याकडे पाठवण्यात आलेली नावे इतर नेत्यांना मान्य नसल्याचे समजते.