Breaking

Sudhakar Badgujar joins BJP : देशद्रोह्यांसोबत पार्ट्या करणाऱ्यासोबत आम्ही आता काम करायचे का ? सिमा हिरेंचा पक्षाला सवाल !

Sima Hire asks now should we work with traitors and criminals : १५ वर्षांपासून बडगुजरांच्या विरोधात लढत आहो, आता सोबत काम करणे केवळ अशक्य

Nasik : उद्धव ठाकरे यांच्या गटातून हकालपट्टी झालेले उपनेते सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला आमदार सिमा हिरे यांनी कडाडून विरोध केला आहे. आज (ता. १७ जून) अचानक बडगुजर यांच्या प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला. त्यांचा ताफा मुंबईच्या दिशेने निघालेला आहे. पण इकडे हिरेंचा विरोध अधिक प्रखर होत चालला आहे. देशद्रोही, गुन्हेगारांसोबत नाचून-नाचून जे पार्ट्या करतात, आता आम्ही काय त्यांच्यासोबत काम करायचे का, असा सवाल सिमा हिरे यांनी पक्षाला केला आहे.

बडगुजरांचा भाजप प्रवेश आता काय वळण घेणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. यासंदर्भात सिमा हिरे यांनी माध्यमांना सांगितले की, बडगुजर यांना आमचा नेहमीच विरोध राहिलेला आहे. ज्यांनी भाजप कार्यालयावर दगडफेक केली. महिला आयोगाच्या विजया रहाटकर यांच्या सभेत जाऊन खुर्च्यांची फेकाफेक केली. देशद्रोही गुन्हेगारांसोबत पार्ट्या करत जे नाचत फिरतात, ज्यांनी गोळीबार केला, अशा गुन्हेगार माणसासोबत काम करणे केवळ अशक्य आहे. बडगुजर यांना आमचा विरोध कायम राहील.

Sudhakar badgujar : राजकारण तापले, बडगुजरांच्या भाजप प्रवेशावरून ‘ गोंधळात गोंधळ ‘

यासंदर्भात आमचे १४ नगरसेवक आणि पदाधिकारी असे ५० लोक मिळून आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि गिरीश महाजन यांच्याशीही आमचे यासंदर्भात बोलणे झाले. तसे पत्रही आम्ही सर्व संबंधितांना दिले आहे. बडगुजर यांची कृत्ये वरिष्ठांपर्यंत पोहोचवली. त्याच वेळेला शिर्षस्थ नेत्यांनी सांगितले की, त्यांचा प्रवेश स्थगित ठेवतो आहे. आठ दिवसांपूर्वी मी वरिष्ठ नेत्यांना भेटले, तेव्हापर्यंत बडगुजरांच्या प्रवेशाला स्थगिती कायम होती. पण आज माझा कुणाशाही संपर्क झालेला नाही.

BJP Politics : बडगुजरांचा ताफा मुंबईकडे रवाना, प्रवेश होणार की अडवला जाणार? संभ्रम कायम !

आज शाळांमध्ये लहान मुलांचे प्रवेश आहेत, शाळेचा पहिला दिवस आहे. त्यांच्या स्वागतासाठी मी इकडेच आहे. पण बडगुजरांचा प्रवेश होता कामा नये. कारण त्यांच्या विरोधात मी दोन वेळा निवडणूक लढवली. त्यांच्या एका समर्थकाच्या विरोधातही आम्ही एक वेळा लढलो आहोत. तिन्ही निवडणुकांत कार्यकर्त्यांना मारहाण करणे, व्यवस्था ताब्यात घेणे, असे प्रकार त्यांनी केले आहेत. १५ वर्षांपासून त्यांच्या विरोधात लढतो आहोत. त्यामुळे आता त्यांच्यासोबत पक्षाच्या मिटींगमध्ये एकत्र येणे, त्यांच्यासोबत प्रचार करणे शक्य नाही, असे सिमा हिरे यांनी ठणकावून सांगितले. आमच्या घरातील तिसरी पीढी भाजपमध्ये काम करत आहे. सासरे पोपटराव हिरे पक्षाच्या स्थापनेपासून आहेत. ते प्रदेश सरचिटणीस होते. त्यांनी पक्षासाठी मोठं काम केलं आहे. मी स्वतः आणि आता आमची मुलंही पक्षाचे काम करत आहेत, असेही सिमा हिरे म्हणाल्या.