Breaking

BJP expansion : अशांना धुवून, घासून आणि पुसून घेण्याची अगतिकता काय?

BJP’s red carpet incoming policies shocked the public and activists : भाजपातील ‘रेड कार्पेट इनकमिंग’ धोरणांवर कार्यकर्त्यांसह सामान्य ही चक्रावले

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. स्वतःची सुरक्षितता आणि भविष्यातील राजकारणाचा विचार करून अनेक जण बलाढ्य झालेल्या भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेकांची गर्दी होत आहे. तर दुसरीकडे इतर पक्षातील पदाधिकारी नेते जे जसे आहेत तसे आपल्याकडे ओढून घेत त्यांना धुवून घासून पुसून स्वच्छ करून त्यांच्या हातात भाजपचा झेंडा देण्याचे ‘रेड कार्पेट इनकमिंग’ धोरण भाजपकडून राबविण्यात येत आहे. याच प्रकाराला ही अगतिकता का असा प्रश्न कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य उपस्थित करत आहेत.

शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात भाजपचे मंत्री निलेश राणे यांनी काही महिन्यांपूर्वीच मोठे रान उठवत त्यांना दहशतवादी घोषित केले. दाऊदच्या साथीदार सोबतच्या पार्टीचे फोटोही त्यांनी जाहीर केले होते. त्यानंतर बडगुजर यांची चौकशी सुरू झाली. या प्रकरणाने नाशिक मध्ये खळबळ उडालेले असताना काही दिवसानंतर मात्र अचानक वारे फिरले आणि एक दिवस हेच बडगुजर नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. ही भेट राजकीय नव्हती तर काही प्रश्न घेऊन निवेदन देण्यासाठी घेतली असे बडगुजर यांनी स्पष्ट केले होते.

Sudhakar Badgujar joins BJP : देशद्रोह्यांसोबत पार्ट्या करणाऱ्यासोबत आम्ही आता काम करायचे का ? सिमा हिरेंचा पक्षाला सवाल !

मात्र नेत्यांच्या भेटीगाठीसाठी येणारा लोककल्याणाचा उमाळा आणि त्यासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रश्नांवरील निवेदनाचा आडोसा आता सगळ्यांच्या लक्षात आलेला आहे. बडगुजर यांची चाल नाशिकच्या स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आली आणि सर्वांनी त्यांच्या भाजप एन्ट्रीवर मोठा आक्षेप घेतला. बडगुजर यांच्या विरोधात निवडणूक लढवून दोन वेळा निवडून आलेल्या आ. सीमा साखरे यांचा तर बांध फुटला. ज्याच्या विरोधात आयुष्यभर लढलो परवापर्यंत टीका केली. त्याच्यासोबत काम कसे करणार असा आक्षेप त्यांनी नोंदवला.

BJP Politics : बडगुजरांचा ताफा मुंबईकडे रवाना, प्रवेश होणार की अडवला जाणार? संभ्रम कायम !

बडगुजरांच्या प्रवेश सोहळ्याला स्थगिती मिळाली अशी स्थिती असताना अचानक बडगुजर सजून धजून कार्यकर्त्यांचा मोठा ताफा घेऊन मुंबईला प्रवेश सोहळ्यासाठी म्हणून रवाना झाले.
दरम्यान भाजप कार्यकर्ते तसेच सर्वसामान्यांनाही अशा व्यक्तींना धुवून पुसून पक्ष प्रवेश करून घेण्यासाठी रेड कार्पेट का टाकले जात आहेत असे प्रश्न निर्माण झाले आहेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी याबद्दल काहीच माहिती नाही असे वक्तव्य करून आणखी गोंधळ वाढवला. कार्यकर्त्यांना शांत करण्याची ही त्यांची खेळी असली तरी भाजपची अशा लोकांना अशी ट्रीटमेंट देऊन पक्षात सामावून घेण्याची काय आगतिकता आहे असा प्रश्न कार्यकर्तेच नव्हे तर सर्वसामान्य ही उपस्थित करत आहेत.

Eknath Shinde Shiv Sena : विदर्भातील शिंदेसेनेत असंतोष; नियुक्त्यांवरील वाद चिघळला

पण सत्ता प्राप्तीसाठी कोणता पक्ष काय करेल सांगता येत नाही तर भाजप यात पण आपली आघाडी कायम ठेवण्यासाठी काहीही करू शकतो हे सगळ्यांना कळून चुकले आहे राजकीय सारीपाटात हे डावपेच तत्कालीन यश मिळवून देणारे असले तरी सर्वसामान्यांचा राजकारणावरचा विश्वास कसा वाढणार याची कोणाला सोयर सुतक राहिलेली नाही. पक्ष कोणताही असो प्रत्येकाने फक्त सत्ताप्राप्तीसाठी हवा नको तो मार्ग निवडायचा विरोधकांना कमकुवत करत एका अर्थाने सरंजामशाहीच राबवायची आणि शेवटी खापर मात्र ‘ माय बाप ‘ म्हणवल्या जाणाऱ्या जनतेवर फोडण्याची व्यवस्था आपल्याला कुठे नेत आहे. याचे उत्तर सध्या कोणाकडे दिसत नाही.

____

  • सचिन काटे (विशेष प्रतिनिधी)

    २७ वर्षांपासून विविध राज्यस्तरीय दैनिकांमध्ये रिपोर्टरपासून कार्यकारी संपादक पर्यंतचा विस्तृत अनुभव. डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात ही यशस्वी योगदान.