Breaking

Harshvardhan sapkal : सोमय्यांवर बेकायदेशीर कृत्यासाठी गुन्हा दाखल करा!

Congress leader demands for case against Somaiya : सत्ताबाह्य केंद्र उखडून टाका, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

Mumbai: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी किरीट सोमय्या यांचा वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयातील एक फोटो समाज माध्यमांवर टाकला आहे. त्यांनी म्हटले आहे की, हा बिनपगारी फुल अधिकारी कोणी नेमला ? सरकारने याला विशेष अधिकार दिले आहेत काय सोमय्या नावाचे सत्ताबाह्य केंद्र उघडून टाका तसेच त्याच्यावर बेकायदेशीर कृत्यासाठी गुन्हा दाखल करा. अशी मागणी यांनी करण्यात आली आहे.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी त्यांनी उपजिल्हाधिकाऱ्याच्या केबिनमध्ये जाऊन केबिन ताब्यात घेतली. स्वतः अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर ते बसले आणि अधिकारी मात्र हातात फाईल घेऊन आजूबाजूला उभे राहून त्यांना उत्तरे देत होते. यासंबंधीचे वृत्त फोटोंसह ‘राज्य कायद्याचे उपऱ्या झुंडांचे’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झाले. तेच आपल्या समाज माध्यमावरील पोस्ट करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी सोमय्यावर कडक शब्दात टीका केली आहे.

 

Harshawardhan Sapkal : निर्लज्जपणे कसे सांगता रे..?

सपकाळ यांनी म्हणले आहे की, किरीट सोमय्या कुठल्या अधिकारात वर्धा उपजिल्हाधिक-यांच्या कार्यालयाचा ताबा घेऊन, खुर्चित बसून अधिकार गाजवत आहे? सरकारने याला विशेष अधिकार दिले आहेत का ? नसतील तर हे सोमय्या नावाचे सत्ताबाह्य केंद्र उखडून टाका. या बेकायदेशीर कृत्यासाठी गुन्हा दाखल करा.

Eknath shinde : जनता घरात बसणाऱ्यांच्या नाही, काम करणाऱ्यांच्या पाठिशी

संबंधित वृत्तांत म्हणले आहे की, महाराष्ट्रात उपऱ्या झुंडांची दादागिरी वाढताना दिसत आहे. भाजप पदाधिकाऱ्याकडून प्रशासनातील अधिकाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार वाढले आहेत. यातच माजी खा. किरीट सोमय्या अधिकाऱ्यांच्या खुर्चीत जोर जबरदस्तीने बसून कारभार करत असल्याचा फोटो वायरल होत आहे. यातून राज्यात कोणाला कायद्याचा धाक राहिलेला नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.