The murder of a minor in a religious institution : धार्मिक संस्थेत अल्पवयीनाचे हादरवणारं हत्याकांड!
Kolhapur : धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेत अल्पवयीन विद्यार्थ्याच्या हत्येचा हादरवून सोडणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हातकणंगले तालुक्यातील आळते येथे एका धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेत अल्पवयीन विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. फैजान नाजिमा (वय 11) असे मृत मुलाचे नाव आहे. या संस्थेतील एका अल्पवयीन मुलानेच फैजानची हत्या केल्याचे उघड झाले आहे. ही संस्था बंद पडून आपल्याला घरी जायला मिळावे, यासाठी ही हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
आळते येथे या धार्मिक शिक्षण संस्थेत तब्बल 80 विद्यार्थी आहेत. यापैकी बहुतांश म्हणजे 70 विद्यार्थी हे बिहारमधील आहेत. हत्या झालेला फैजान नजीमा आणि हत्या करणारा हे दोघेही बिहारचे होते. हत्या करणाऱ्या विद्यार्थ्याला बिहारमधील आपल्या गावी जायचे होते. त्यासाठी ही संस्था बंद पडावी, या उद्देशाने त्याने फैजानची शॉक देऊन हत्या केली. फैजानचा मृतदेह सापडला तेव्हा झोपेतच त्याचा मृत्यू झाल्याचे सुरुवातीला सांगितले जात होते. मात्र, पोलिसांना संशय आल्याने त्यांनी संस्थेतील मुलांची चौकशी केली. त्यावेळी एका अल्पवयीन विद्यार्थ्याने आपणच फैजानला इलेक्ट्रिक वायरचा शॉक देऊन त्याची हत्या केल्याची कबुली दिली.
Sharad Pawar: तर…. ही परिस्थिती आली नसती; शरद पवारांचा अजितदादांना टोला
आळते या गावात धार्मिक शिक्षण देणारी संस्था आहे. या संस्थेत बहुसंख्य विद्यार्थी हे बिहारचे आहेत. अल्पवयीन मुलं घर सोडून शेकडो किमी परराज्यात महाराष्ट्रात येतात, तिथे धार्मिक शिक्षण घेतात. या सर्व प्रकाराला कंटाळून, घरापासून लांब राहण्याला वैतागून विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचललं. शिक्षण संस्था बंद पडून घरी जायला मिळावे म्हणून विद्यार्थ्यानेच विद्यार्थ्याची शॉक देऊन हत्या केली. तो 11 वर्षाचा होता. फैजानचा झोपलेल्या अवस्थेत मृत्यू झाला तो. संशयास्पद वाटल्याने, पोलिसांनी अधिक चौकशी केली. यावेळी पोलिसांच्या चौकशीत ही थरारक घटना समोर आली.