Annual Fastag pass on National Highway from 15th August: गडकरींचा मोठा दिलासा; देशभर निर्बंधमुक्त प्रवासास गती
New delhi केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी खासगी वाहनांना fastag च्या संदर्भात मोठा दिलासा दिला आहे. सरकार १५ ऑगस्टपासून खासगी वाहनांसाठी फास्टॅग आधारित वार्षिक पास लागू करणार आहे.
या पासची किंमत ₹३,००० असेल आणि राष्ट्रीय महामार्गांवर अडथळारहित व खर्चिकदृष्ट्या लाभदायक प्रवास सुनिश्चित करेल.
हा पास लागू झाल्यानंतर तो एका वर्षासाठी किंवा २०० प्रवासांपर्यंत (जे आधी संपेल) वैध असेल. याची रचना केवळ खासगी, अवाणिज्यिक वाहनांसाठी – जसे की कार, जीप आणि व्हॅन – यांच्यासाठी करण्यात आली आहे.
Nitin Gadkari : आप राहुल गांधी को इतना सिरीयसली क्यों लेते हो?
या नव्या उपक्रमामुळे ६० किमीच्या परिसरात असलेल्या टोल नाक्यांबाबत दीर्घकाळपासून असलेल्या तक्रारी कमी होतील, असे गडकरी म्हणाले.
रस्ते वाहतूक मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, ज्या वाहनांवर आधीच वैध फास्टॅग आहे, त्यांना नवीन फास्टॅग घ्यायची गरज नाही. पात्र फास्टॅगवरच हा वार्षिक पास सक्रिय केला जाऊ शकतो.
Rashtriya swayamsevak sangh : भाजप नेत्यांच्या अपेक्षा, संघाने दिला सल्ला
हा पास केवळ राष्ट्रीय महामार्ग (NH) आणि राष्ट्रीय द्रुतगतीमार्गांवरील (NE) टोल नाक्यांवर लागू राहील. राज्य महामार्ग वा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियंत्रणातील टोल नाक्यांवर नेहमीच्या फास्टॅगसारखे शुल्क आकारले जाईल.
ही योजना ऐच्छिक आहे. ज्यांना वार्षिक पास घ्यायचा नसेल, ते पूर्वीप्रमाणे फास्टॅगद्वारे नियमित टोल भरू शकतात. २०० प्रवास पूर्ण झाल्यानंतर वापरकर्ते, वर्ष संपण्याआधीही, नवीन पास पुन्हा खरेदी करू शकतात.
सध्या वार्षिक ₹४,०८० किंमतीचे स्थानिक पास उपलब्ध आहेत, मात्र खासगी कार टोल वाहतुकीच्या ५३% वाटा असूनही केवळ २१% महसूल देतात. नवीन योजना यामध्ये समतोल साधेल, अशी अपेक्षा आहे.