Breaking

Pune Crime: रात्री कारमध्ये मैत्रिणीसोबत दिसला म्हणून तरुणाला दोन पोलिसांनीच लुटले

Policeman suspended for stealing Rs 20,000 by taking it to ATM :स्वतःच्या गाडीवर बसवून एटीएममध्ये नेत 20 हजार उकळणारे पोलीस निलंबित

Pune: मैत्रिणीसोबत कारमध्ये बसलेल्या तरुणाला धमकावून तरुणांकडून 20 हजार रुपये उकळणारे दोन पोलीस निलंबित करण्यात आले आहेत. नाट्यमय घडामोडी या पोलिसांनी घाबरलेल्या तरुणाला पैसे मागितले त्याने ते देण्यास असमर्थता दर्शवली तेव्हा त्याला स्वतःच्या गाडीवर बसवून एटीएम मध्ये नेलं आणि पैसे काढायला लावले आणि पैसे उकळले. या प्रकराने घाबरलेल्या तरुण व त्याच्या मैत्रिणीने डेक्कन पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर संबंधित पोलिसांची चौकशी करण्यात आली.आणि हा प्रकार उघडकीस आला.

विधी महाविद्यालय रस्त्यावरील दामले पथ परिसरात रात्री एक तरुण त्याच्या मैत्रिणीसमवेत कारमध्ये गप्पा मारत बसले होते. त्यावेळी पोलीस कर्मचारी गणेश देसाई व योगेश सुतार हे रात्रगस्तीवर होते. ते दोघेही तेथे आले. त्यांनी तरुणाला तुमच्याबद्दल तक्रार आली आहे,पोलिस ठाण्यात प्रकरण न्यायचे नसेल तर 20 हजार रुपये दे, अशी मागणी केली. तरुणाजवळ सहाजिक एवढे पैसे नव्हते. तर पोलिस कर्मचाऱ्यांनी तरुणास दुचाकीवर बसवून कमला नेहरू पार्क परिसरातील एटीएममध्ये नेले. तेथे त्याच्याकडून 20 हजार रुपये काढून घेतले.

Sanjay Raut : राज्यात दोन हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जमाफीची योग्य वेळ कोणती?

या प्रकराने घाबरलेल्या तरुण व त्याच्या मैत्रिणीने डेक्कन पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर संबंधित पोलिसांची चौकशी करण्यात आली. या प्रकाराबाबत दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना माहिती दिली नाही.त्यांच्या वर्तनामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवून दोघांचे निलंबन केल्याचा आदेश पोलिस उपायुक्त पिंगळे यांनी दिले. गणेश देसाई आणि योगेश सुतार अशी निलंबन करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या कारवाईमुळे पोलिस दलात खळबळ निर्माण झाली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.