War broke out, the US blew up three nuclear plants in Iran : युद्ध भडकले इराणमधील तीन अणु प्रकल्प अमेरिकेने उडवले
New Delhi: इस्रायल-इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांकडून हवाई हल्ले करण्यात येत आहेत. इस्त्रायलने इराणमधील तेहरानला टार्गेट केलं आहे, तर इराणकडूनही इस्रायलमधील काही शहरांवर हवाई हल्ले करण्यात येत आहेत. या दोन्ही देशातील संघर्षात आता अमेरिकेची एन्ट्री झाली आहे. इराण-इस्रायलच्या संघर्षात अमेरिकेने सहभागी होत इराणवर मोठा हवाई हल्ला केला. या संदर्भातील माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल माध्यमावर दिली आहे.
अमेरिकेने इराणवर मोठे हवाई हल्ले केले. अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यात इराणमधील ३ अणुकेंद्र नष्ट झाल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. या संदर्भातील माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. अमेरिकेने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आहेत. तसेच इराणवर हवाई हल्ला करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय इतिहास बदलेल, असं बिन्यामिन नेतान्याहू यांनी म्हटलं आहे. दरम्यान, इराणच्या अणुस्थळांवर अमेरिकेच्या हल्ल्यानंतर कतारने दुःख व्यक्त केले आहे.
Pune Crime: रात्री कारमध्ये मैत्रिणीसोबत दिसला म्हणून तरुणाला दोन पोलिसांनीच लुटले
गेल्या दहा दिवसांपासून इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या लष्करी संघर्षात आता अमेरिकेने थेट सहभाग घेतला या हल्ल्यांनंतर काही तासांतच इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी बदला घेणार असल्याचा इशारा दिला आहे. अयातुल्ला अली खामेनी यांचे प्रतिनिधी हुसेन शरीयतमदारी यांनी इराणी माध्यमांना सांगितले की, पहिले पाऊल म्हणून ते बहरीनमधील अमेरिकन नौदलाच्या ताफ्यावर क्षेपणास्त्र हल्ला करतील आणि होर्मुझचा सागरी मार्ग बंद करतील.
Sanjay Raut : राज्यात दोन हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जमाफीची योग्य वेळ कोणती?
इस्रायल आणि इराणमध्ये हवाई हल्ले सुरु आहेत. आता इराणने पुन्हा उत्तर इस्रायलमधील अनेक भागांना लक्ष्य केलं आहे. इस्रायली माध्यमांनी सांगितलं की, नेस झिओना, रिशोन लेझिओन आणि बंदर शहर हैफा येथे हल्ला झाला. या हल्ल्यात मध्य आणि उत्तर इस्रायलमधील अनेक भागांना फटका बसला आहे. आता इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला असून यामध्ये ११ जण जखमी झाले आहेत.