Breaking

Girish Mahajan : मुख्यमंत्र्यांना विचारून पालकमंत्री नेमा, महाजनांचा पत्रकारांना सल्ला !

Ask to Chief Minister Devendra Fadnavis and appoint Nashik’s Guardian Minister Advice to journalists of Nagpur : शॅडो पालकमंत्री म्हणून अधिकार नाही, मी कुंभमेळा मंत्री म्हणून का करतोय

Nagpur : महायुतीचे सरकार स्थापन होऊन सहा महिने उलटले. तरीही नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. यासंदर्भात राज्याचे जलसंसाधन मंत्री गिरीष महाजन यांना पत्रकारांनी विचारले असता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आहेत. पालकमंत्र्याच्या संदर्भात त्यांना तुम्हीच विचारावं. मी कुंभमेळा मंत्री म्हणून काम करतोय. मला शॅडो पालकमंत्री म्हणून अधिकार नाहीत. त्यासाठी पालकमंत्रीच लागतो. तुम्हीच मुख्यमंत्र्यांना विचारून पालकमंत्री नेमा, असा सल्ला मिश्कीलपणे त्यांनी दिला.

आज (ता. २२ जून) नागपुरात आले असता गिरीष महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी हिंदीच्या सक्तीबाबत प्रश्न विचारला असता, यासंदर्भात मुख्यमंत्री उत्तर देतील, असे ते म्हणाले. संजय राऊत यांच्या हल्लीच्या वक्तव्यांबद्दल विचारले असता, स्वप्नं बघायला काही हरकत नाही. त्यासाठी काही लागत नाही. उद्धव ठाकरे पंतप्रधान होऊन शकतात, असेही राऊतांनी सांगितले आहे. पंतप्रधान होण्याचंसुद्धा त्यांचे स्वप्नं आहे. त्यांनी ते बघावं, असे म्हणत महाजन यांनी ठाकरेंना टोला हाणला.

Iran-Israel War : अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणचा इस्रायलवर मोठा हवाई हल्ला!

कुंभमेळ्यासंदर्भात माहिती देताना ते म्हणाले की, यंदा कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही राष्ट्रीय महामार्गांची कामे प्रस्तावित आहेत. गोटी-त्र्यंबकेश्वर-जवाहर हा रस्त मुंबईपर्यंत येणार. यासाठी चार पदरी रस्ता ३७०० कोटी रुपये खर्चून तयार होत आहे. नाशिक-सिन्नरचाही विस्तार केला जाणार आहे. नाशिककडे येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांवर सोयी निर्माण करून त्याचाही विस्तार केला जाणार आहे. द्वारका जंक्शन नगर बोगदा यांसह महत्वाच्या रस्त्यांच्या संदर्भात चर्चा झालेली आहे.

Pune Crime: रात्री कारमध्ये मैत्रिणीसोबत दिसला म्हणून तरुणाला दोन पोलिसांनीच लुटले

नाशिक रिंग रोड आहे. या रोडचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. दीड ते दोन वर्षांत सर्व कामे पूर्ण करू. जळगाव ते संभाजीनगर दरम्यान जोडण्यासाठी पर्याय शोधला आहे. जेणेकरून मुंबईला पोहोचण्यासाठी मार्ग उपलब्ध होणार आहे, असेही मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.