Chief Minister to increase BJPs strength in Indapur : इंदापूरमध्ये भाजपची ताकद वाढवण्यासाठी मुख्यमंत्री मैदानात
Pune : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपची साथ सोडत शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर इंदापुरात पुन्हा भाजपची ताकद वाढवण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस मैदानात उतरले आहेत. पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य विभागाचे माजी सभापती व सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण माने भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा आहे.
देवेंद्र फडणवीस नुकतेच ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी पुण्यात आले होते. त्यावेळी रात्री उशिरा प्रवीण माने यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीमध्ये माने यांच्यासोबत दौंडचे आमदार राहुल कुल उपस्थित होते. त्यासोबतच सोनाई उद्योग समूहाचे प्रमुख दशरथ माने, इंदापूर बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील, यांच्यासह परिसरातील म्हणायचे काही नेतेमंडळी उपस्थित होती. त्यामुळे इंदापूरमध्ये भाजप जम्बो प्रवेशाच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
Sudhir Mungantiwar : पोंभुर्णा तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत करा, अन्यथा जनआंदोलन उभारू
प्रवीण माने हे भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र, महायुतीमध्ये ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटल्यामुळे मानेंनी अपक्ष निवडणूक लढवली. यामध्ये त्यांना 38 हजार मतं मिळाली. इंदापूर तालुक्यात प्रवीण माने यांची मोठी ताकद आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर निर्माण झालेली पोकळी प्रवीण माने यांच्या रूपाने भाजप भरू इच्छित आहे. आता राहुल कुल यांच्यामार्फत प्रवीण माने हे भाजपच्या संपर्कात असून लवकरच मुंबईमध्ये त्यांचा प्रवेश सोहळा होणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
School opening: विदर्भातील बहुतांश शाळांमध्ये पहिल्याच दिवशी शुकशुकाट
दरम्यान, इंदापूर तालुक्यातील विविध विकासकामांवर चर्चा झाली असून, तालुक्याला आणखी जास्तीचा निधी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याचे प्रवीण माने यांनी सांगितले. तर, लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली इंदापूर येथे एक भव्य शेतकरी मेळावा पार पडणार असल्याची माहिती देण्यात येत आहे.
Eknath Shinde Shiv Sena : शिंदेसेनेला नेत्यांमधील मतभेदाचे टेंशन; पूर्व विदर्भासाठी मास्टर प्लान!
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना देवेंद्र फडणवीस हे त्यांचे कुलदैवत असणाऱ्या इंदापूर तालुक्यातील श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर येथील लक्ष्मी-नरसिंहाच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी प्रवीण माने हे फडणवीसांच्या स्वागतासाठी जातीने हजर होते. त्यामुळे कित्येक दिवसांपासून प्रवीण माने हे भाजपच्या संपर्कात असल्याचं दिसत होतं. माने भाजपमध्ये आल्यामुळे इंदापूर परिसरात भाजपची ताकद वाढणार असून हर्षवर्धन पाटलांना तो धक्का असल्याचे मानण्यात येत आहे.