The government has launched an ambitious scheme called Udaan 5.5 for this purpose : देशभरात १५० तर महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांमध्ये राबवणार योजना
Nagpur : नागपूर जिल्ह्यात आणि विदर्भात जेथे जेथे शक्य आहे, तेथे आपल्याला जल वाहतूक आणि हवाई वाहतूक सुरू करायची आहे. यामध्ये नाग नदीतून बोटीने लोक प्रवास करतील आणि नागपूर जिल्ह्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लोक विमानाने जातील, नेहमीच भन्नाट उपक्रम राबवणारे आणि शक्य करून दाखवणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही वर्षांपूर्वी ही कल्पना मांडली होती.
नागपुरातून रामटेक तालुक्यातील खिंडसीच्या तलावात सी प्लेन उतरेल, अशी माहितीही त्यांनी त्यावेळी दिली होती. काहीशी अशक्य असणारी ही कल्पना असल्याचे त्यावेळी काहींचे म्हणणे होते. अनेकांचा गडकरींवर तेव्हा विश्वास बसला नव्हता. पण त्यांनी तेव्हा मांडलेली कल्पना आज मूर्त रूप घेते आहे. सध्याच नाग नदीतून बोट तर नाही. पण लवकरच नागपूरच्या आकाशात विमाने घिरट्या घालताना दिसणार आहेत. पारशिवणी, पेंच आणि खिंडसीच्या तलावांत आता लवकरच सी प्लेन उतरणार आहेत.
Local Body elections : ‘भाऊ’, ‘भाई’ अन् ‘दादां’नी कसली कंबर !
नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आठ ठिकाणी सी प्लेन सेवा सुरू करण्यात येणार आहे. दुर्गम भागांमध्ये हवाई संपर्क वाढवण्यासाठी आणि पर्यटनाच्या क्षेत्राला चालना देण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे. देशभरात १५० ठिकाणी ही सेवा सुरू करण्याचे सरकारचे नियोजन आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील आठ ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे.
Tara Bhavalkar : हिंदी भाषा सक्तीची असे सरकारने कुठेही म्हटले नाही पण….
यामध्ये साताऱ्यातील धोम धरण, नाशिकमधील गंगापूर धरण, पुण्यामधील पवना धरण, रत्नागिरीमधील गणपती पुळे, रत्नागिरीसह विदर्भातील नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील खिंडसी, बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील कोराडी धरण, पेंच आणि पारशिवणी येथे सी प्लेन सेवा सुरू करण्यात येणार आहे. ‘उडान ५.५’ ही योजना सरकारने यासाठी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत हेलिकॉप्टर आणि सी प्लेनद्वारे दुर्गम भागांत हवाई संपर्क आणि पर्यटन वाढवण्यात येणार आहेत. देशभरात १५० तर महाराष्ट्रातील आठ ठिकाणी हा प्रकल्प राबवला जाणार आहे. आता सी प्लेन लवकरच जनतेच्या सेवेत येणार आहेत, तर नाग नदीतून बोटीने प्रवासही लवकरच शक्य होईल, अशी अपेक्षा नागपूरकर व्यक्त करत आहेत.