Breaking

Conflict on Hindi language compulsion : हिंदी सक्तीला विरोध! मराठी माणसांचा ५ जुलैला भव्य मोर्चा

Raj Thackeray rejected governments stand : राज ठाकरेंनी सरकारची भूमिका फेटाळली, उद्धव ठाकरेंकडूनही जाहीर विरोध

Mumbai: राज्यात इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या हालचाली सुरू आहेत. याला आता मोठा विरोध होऊ लागला आहे. शिक्षण मंत्र्यांनी मांडलेली भूमिका राज ठाकरे यांनी फेटाळत ५  जुलैला मराठी माणसांचा भव्य मोर्चा आयोजित केला आहे. तर उद्धव ठाकरे Uddhav Thackaeray यांची मराठी समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली, त्यांनी पण हिंदी सक्तीला विरोध केला असून शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा व्यक्त केला आहे.

पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषेचा पर्याय देण्यात येत आहे .सरकारच्या या धोरणाबद्दल राज ठाकरे यांनी सुरुवातीपासून विरोध दर्शवला आहे. मनसेने या संदर्भात आंदोलनही सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन सरकारची त्रिभाषा धोरणा संदर्भातील भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी स्पष्ट केले की, आम्हाला राज्य शासनाची भूमिका बिलकुल मान्य नाही.

Sudhir Mungantiwar : ‘त्या’ सर्व अफवाच..! वनजमिनीवरील घरांबाबतचा संभ्रम मुनगंटीवारांनी संपवला !

सरकारच्या निर्णयाविरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन या गोष्टीला विरोध करावा असे आवाहन राज ठाकरे यांनी केले असून, सहा जुलै रोजी मराठी माणसांचा भव्य मोर्चा गिरगावातून निघेल अशी घोषणा त्यांनी केली. या मोर्चात सर्व पक्षांनी सहभागी व्हावे. या मोर्चाचे नेतृत्व मराठी माणूस करेल. या मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल तेव्हा मराठी अभिनेते, लेखक ,पालक, विद्यार्थी अशा सर्व घटकांनी सहभागी व्हावे आणि मराठीची ताकद दाखवावी असे आवाहन केले आहे.

शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मांडलेली पूर्ण भूमिका फेटाळून लावत असून आम्हाला हा निर्णय मान्य नाही असे त्यांना स्पष्टपणे सांगितल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये असा कुठलाही मुद्दा नाही हे राज्यांनी उचललेले पाऊल आहे. मग निर्णय घेण्याचे कारण काय? असा प्रश्नही राज यांनी उपस्थित केला आहे. आयएएस अधिकाऱ्यांसाठी सी बी एस सी शाळा काढण्यात आलेल्या आहेत हिंदी सक्ती बाकी राज्य करत नाहीमग महाराष्ट्र हे का करत आहे? बाकी राज्य अशी भूमिका घेत नाहीत. आमचा या संपूर्ण प्रकाराला विरोध आहे, असेल आणि राहणार असेही त्यांनी स्पष्ट केले

Farmers’ organizations : असशील तू लोणीकर, पण मीही तुपकर आहे !

हिंदी किंवा कोणत्याही भाषेची सक्ती असू नये.मी सर्व पक्षांना आवाहन करत आहे की येत्या सहा जुलैला आम्ही गिरगाव वरून मोर्चा काढायचे ठरवले आहे. या मोर्चात कोणताही झेंडा नसेल, हा मराठी माणसाचा मोर्चा असेल ,सर्वांना या मोर्चाचे आमंत्रण देत आहोत. मी बाकी पक्षांसोबत बोलणार आहे असेही राज ठाकरेंनी स्पष्ट केले.

Vijay Wadettiwar : इतके माजू नका रे… हेच शेतकरी तुम्हाला पुन्हा शुन्यावर आणतील !

शिवसेना उद्धव ठाकरे यांचाही या हिंदीचा सक्तीला विरोध असून, ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय राऊत यांनी या संदर्भात भूमिका व्यक्त केलेली आहे. आज मराठी भाषा समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाची माहिती दिली आणि शिवसेनेने त्यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे यांनीही आपल्या शैलीत भाजपवर टीका केली असून आंदोलनात सहभागी होणार असल्याचे म्हटले आहे.