Breaking

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी हिंदीचा शासन निर्णय फाडला, राज्यभर आंदोलन निर्णयाची होळी !

Shiv Sena Thackeray and Mahavikas Aghadi participating in protest : शिवसेना ठाकरे गटासह महाविकास आघाडीचे घटक पक्षही आंदोलनात सहभागी

Mumbai: तिसरी पर्यायी भाषा म्हणून हिंदी संदर्भात काढण्यात आलेल्या शासन निर्णयाविरोधात सर्व विरोधी पक्ष एकवटले आहेत. हिंदी सक्तीच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष राज्यभर आंदोलन करत आहे. मुंबई मराठी पत्रकार संघ कार्यालय परिसरात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. यावेळी ठाकरेंनी या शासन निर्णयाचा प्रतिनिखात्मक कागद फाडला. या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अन्य विरोधी पक्ष तसेच मराठी कलाकारही सहभागी झाले.

राष्ट्रीय शिक्षण धोरण अंतर्गत बदल करून राज्य शासनाने पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना हिंदी सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने मुंबईत 5 जुलै रोजी मोर्चाचे आयोजन केले आहे. यापूर्वी राज्यभरामध्ये तालुकास्तरावर हिंदी सक्तीच्या जीआरची आज होळी करत निषेध नोंदवण्यात आला.

Buldhana Politics : चिखलीत काँग्रेसला मोठा धक्का; अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश

हिंदी शक्तीच्या मुद्द्यावर, मराठी अभ्यास केंद्र आणि समविचारी संस्थाची एक बैठक पण पार पडली. त्यानंतर शासनाच्या जीआरची होळी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या आंदोलनात ठाकरेंचे शिवसैनिक, तसेच महाविकास आघाडीचे नेते, काही मराठी कलाकार आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “मुंबईत होणाऱ्या या आंदोलनासाठी सगळ्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. याचा पहिला टप्पा होता. शासन निर्णयाची होळी करणे. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या सरकारने जो हिंदी सक्तीचा आदेश काढला आहे त्याची होळी करण्यात आली. यात केवळ शिवसैनिक नाही तर, त्या त्या भागातील मराठी जनता, साहित्यिक, लेखक यांनाही आमंत्रित केले आहे.

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचा दावा, महाराष्ट्र-गुजरातमधील नागरी बँकांचे विकासात मोठे योगदान

हिंदीच्या निर्णयाविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 5 जुलैला मुंबईत एकत्र मोर्चा काढणार आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलं आहे. हिंदीच्या मुद्द्यावर मोर्चाची वेळच येऊ नये, असा प्रयत्न असल्याचं अजित पवार म्हणाले. चर्चेतून चांगला मार्ग निघू शकतो असं देखील अजित पवार यांनी म्हटलं आहे.