fight for Maratha reservation from OBC category : ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षणासाठी ‘ आर पारची’ ची लढाई
Antarwali Sarati : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात उतरले आहेत. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, पुढचे आंदोलन मुंबईतच असेल. हे आंदोलन निर्णायक असून, मराठा समाजाच्या विजयाचा गुलाल उधळायचाच आहे, मुंबईतील हे आंदोलन आता फक्त मागणीचं नाही, तर निर्णय घेण्यासाठीचं असेल, असे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.
जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी बैठक आयोजित केली होती. राज्यभरातून मराठा कार्यकर्ते अंतरवाली सराटीमध्ये बैठकीसाठी दाखल झाले होते. या बैठकीत मराठा आरक्षणासह दोन वर्षे आंदोलन करून काय मिळालं? आणि आता काय मिळवायचं? या मुद्द्यावर चर्चा झाली. तसेच 29 ऑगस्टच्या मुंबई आंदोलनाच्या नियोजनाबाबत यावेळी चर्चा झाली.
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी हिंदीचा शासन निर्णय फाडला, राज्यभर आंदोलन निर्णयाची होळी !
यबैठकीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.”आपल्याला रणभूमीत उतरायचं आहे, आणि विजयही निश्चित मिळवायचा आहे. रणभूमीची तयारी अशी असली पाहिजे की, यावेळी यश आपलंच असणार,” असे सांगत ते म्हणाले, “आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही. मैदान आपणच गाजवायचं आहे, विजयाचा गुलाल पण आपल्या अंगावरच उधळला गेला पाहिजे.” गेल्या दोन वर्षांपासून मराठा समाजासाठी आंदोलन सुरू असून, आता लढाई अंतिम टप्प्यात आली. “ही शेवटची लढाई मराठ्यांनी जिद्दीने आणि एकजुटीने पार पाडली पाहिजे.”
Buldhana Politics : चिखलीत काँग्रेसला मोठा धक्का; अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, 29 ऑगस्टला मुंबईला जायचं आहे. 27 ऑगस्ट रोजी अंतरवालीतून निघायचं आहे. कुठेही न थांबता 28 ऑगस्टला रात्री मुंबईत पोहचायचे. मुंबईतील सर्वच लोकांनी तेव्हा आपली सेवा केली, त्यात परप्रांतीय सुद्धा होते. पावसाचे दिवस आहेत. पण मला तुम्ही मुंबईत सोडायला या, पुढचं मी पाहतो.अशी संधी पुन्हा मिळणार नाही विजयाची चाहूल लागली आहे, असेही म्हणत जरांगे यांनी स्पष्ट केले.