Crime : धक्कादायक, वारकऱ्यांना अडवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार!

Terror of goons stopped the Warkaris who leaving for Pandharpur : गुंडांची दहशत, पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता लावून केले कृत्य

Pune : आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांना अडवून, त्यांच्या गळ्याला कोयते लावून. त्यांच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दौंड परिसरात उघडकीस आली आहे. परिसरात गुंडांची मोठी दहशत असून त्यांच्यावर कोणताही अंकुश राहिलेला नसल्याचे या भागात घडणाऱ्या घटनांवरून समोर येत आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातून पालख्या पंढरपूर कडे जात असताना असा प्रकार समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
आषाढी वारी हा संपूर्ण महाराष्ट्राचा एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक व आध्यात्मिक उत्सव आहे. या काळात राज्यात भक्तीमय वातावरण, उत्साह आणि चैतन्याची लहर पाहायला मिळत असते. वारीच्या निमित्ताने संतांच्या पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत. लाखो वारकरी ‘माऊली-माऊली’ सोबत विठुरायाचा जयघोष करत दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत.या वारीतून ही धक्कादायक घटना समोर आली आहे.

Dhananjay Munde : विनयभंग प्रकरणातील आरोपीचे आ. धनंजय मुंडेंसोबतचे फोटो व्हायरल

पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना अडवून लुटल्याची घटना समोर आली आहे. तसेच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे ही धक्कादायक घटना घडली. पंढरपूरकडे जाताना वारकरी वाटेत चहासाठी थांबले होते. चहा घेतल्यानंतर ते गाडीत बसत असताना दोन जण गाडीवरून आले. त्यांनी वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता लावला. आणि वारकऱ्यांना लुटून अल्पवयीन मुलीला काही अंतरावर नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. °

Hindi controversy ; मराठी अस्मिता, विरोधकांची एकजूट, निवडणुकांमुळे सरकारने घेतला ‘यु टर्न’!

या घटनेमुळे दौंडमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत असून. पोलीस अज्ञातांचा शोध घेत आहेत. दौंड परिसरात लुटमारीच्या घटना कायम समोर येत असतात. गुंडांवर कोणाचाही अंकुश नसून त्यांची दहशत कायम आहे. भक्ती मार्गाने पंढरपूर कडे निघालेल्या वारकऱ्यांची अनेक जण सेवा करतात त्यांना मदत करतात. हे वारी मार्गावर पाहायला मिळते. पण या वारकऱ्यांना लुटण्याचा तसेच अत्याचाराचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.