Shiv Sena forms Rajya Vidyut Karmachari Sena : नागपुरात केली राज्य विद्युत कर्मचारी सेनेची स्थापना
Nagpur गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर सुरू आहे. जाहीरपणे असे दिसत नसले तरीही राजकीय व्यासपीठांवर ते ठळक दिसतय. अलीकडेच विदर्भ दौऱ्यात असताना एकनाथ शिंदेंनी नागपुरात राज्य विद्युत कर्मचारी सेनेची स्थापना केली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंची ही ‘ऊर्जा’ कुणासाठी धोक्याची ठरणार, याची चर्चा सुरू झाली आहे.
नागपुरात शिवसेनेचे अस्तित्व आता कमी झाले आहे. अश्यात एका नव्या संघटनेची स्थापना करून शिंदे यांनी भाजप आणि ठाकरे गटात अस्वस्थता निर्माण केली आहे. त्यातही ऊर्जा खाते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यामुळे ही संघटना स्थापन करण्यामागे राजकीय कारण असण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.
Nagpur Municipal corporation election : जनसंपर्कात पैसा खर्च होत आहे, पण निवडणुकीचा पत्ता नाही!
महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी सेना या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेत शिवसेना (उबाठा) च्या कामगार संघटनेतील अनेक पदाधिकारीही सहभागी झाले आहेत. या संघटनेच्या चिन्हाचे अनावरण नागपुरात झाले. सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट, राज्यमंत्री आशीष जयस्वाल, संघटनेचे मार्गदर्शक आमदार कृपाल तुमाने, आमदार मनीषा कायंदे आणि किरण पांडव यांचीही यावेळी उपस्थिती होती.
Nagpur Divisional Commissioner : तृतीयपंथींसाठी शासकीय रुग्णालयांमध्ये स्वतंत्र व्यवस्था करा
महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी सेना ही संघटना वीज कर्मचाऱ्यांच्या हितासाठी काम करेल. त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल, असं यावेळी सांगण्यात आलं. संघटनेचे अध्यक्ष योगेश विटनकर, कार्याध्यक्ष मनोज मेश्राम व प्रवीण पाठराबे, महासचिव डॉ. अविनाश आचार्य, दिलीप आवळे, जीवन डहाट, आशीष इंगळे, श्रीरंग दहासहस्त्र आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.