PIL against the stalled work of the flyover in High Court : दिरंगाईच्या विरोधात माजी मंत्री डॉ. सुनील देशमुखांकडून याचिका
Amravati अमरावतीतील चित्रा चौक–इतवारा बाजार–नागपुरी गेट या महत्त्वाच्या मार्गावर सात वर्षांपासून सुरू असलेले उड्डाणपुलाचे काम अद्यापही अपूर्ण आहे. या रखडलेल्या प्रकल्पामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी व प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. या दिरंगाईविरोधात माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.
या याचिकेतील प्रतिवादी म्हणून राज्य शासन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव, अमरावती येथील कार्यकारी अभियंता आणि कंत्राटदार मे. चाफेकर अॅण्ड कंपनी यांना समाविष्ट करण्यात आले आहे. न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती सचिन देशमुख यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने सरकारी पक्षाच्या अधिवक्त्यांना निर्देश देत प्रतिवादींना नोटीस बजावली असून, उड्डाणपुलाचे काम कधी पूर्ण होणार याबाबतचा रोड मॅप सात दिवसांच्या आत सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
Babanrao Lonikar controversy : लोणीकरांच्या विरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन!
ही याचिका वकील शाहू चिखले यांच्या माध्यमातून दाखल करण्यात आली आहे. त्यांनी न्यायालयात शहराच्या हिताच्या दृष्टीने प्रभावी युक्तिवाद सादर केला. याचिकेच्या रेट्यामुळे रखडलेला प्रकल्प मार्गी लागण्यास चालना मिळेल, अशी नागरिकांमध्ये आशा निर्माण झाली आहे.
जनहित याचिकेतील ठळक मुद्दे
संविधानाच्या कलम २१ अंतर्गत नागरिकांना मिळालेल्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन
रखडलेल्या बांधकामामुळे निर्माण होणारे प्रदूषण आणि आरोग्यावरील परिणाम
वाहतूक कोंडीमुळे होणारी मानसिक त्रासदायक स्थिती
प्रकल्प रखडल्यामुळे वाढलेली किंमत आणि त्यामुळे होणारा सार्वजनिक निधीचा अपव्यय
बांधकाम पूर्ण करण्यासाठी निधीची उपलब्धता आणि ठराविक वेळेत पूर्णता यासाठी शासनाला निर्देश