Thackeray brothers rally invites Narendra Modi and Amit Shah :ठाकरे बंधूंच्या मोर्चाचे नरेंद्र मोदी अमित शहा यांना निमंत्रण!
Mumbai : मराठी माणसांची, महाराष्ट्राची एकजूट ही पक्षांपलीकडची आहे. जेव्हा-जेव्हा दिल्लीने अघोरी कायद्याच्या आधारे, सत्तेच्या आधारावर आमच्यावर हल्ले केले, तेव्हा तेव्हा महाराष्ट्र हा अधिक ताकदीने, उसळून उभा राहिला. पाच जुलैला मराठी विजय दिवस साजरा करणार आहोत. त्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनाही आम्ही निमंत्रण देणार आहोत.असं संजय राऊत यांनी आज सांगितले आहे.
शिवसेनेचे वाघ जिवंत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिघांनी मिळून शिवसेना तोडली. म्हणजे महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना सांगितलं की, टायगर अभी जिंदा हैं. पाच जुलैला मराठी विजय दिवस साजरा करत आहोत त्याचं त्यांनाही आम्ही निमंत्रण देणार आहोत. त्यांनी पहावा विजय दिवसाचा हा सोहळा काय आहे. मराठी भाषेसंदर्भात, हिंदी सक्ती संदर्भात मराठी एकजुटीने जो विजय प्राप्त केला, तो महाराष्ट्र द्वेष्टयांवरचा विजय आहे. म्हणून त्यांना जयमहाराष्ट्र केला असं संजय राऊत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.
नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख त्यांनी प्रिय असा केला. त्याबद्दल बोलताना राऊत म्हणाले की, शत्रुला कधीही प्रिय म्हटलं पाहिजे. शिवसेनाप्रमुखांनी सांगितलय शत्रू हा कधीही तोलामोलाचा असला पाहिजे. महाराष्ट्राच्या दुश्मनांशी आम्ही जो काय संघर्ष केला, दुश्मनांना आम्ही दाखवलं महाराष्ट्राची एकजूट काय आहे ते
पापाचा द्वेष करा, पाप्याचा द्वेष करु नका असा एक इंग्रजीत सुविचार आहे. जेव्हा-जेव्हा या प्रकारचे दुश्मन महाराष्ट्रा समोर राहतील, त्यावेळी संघर्ष करायला, शिवसेनेला, उद्धव ठाकरेंना, राज ठाकरे, शरद पवार आम्हाला मजा येते. आम्ही लढणारे लोक आहोत. त्यांना वाटलं त्यांनी जे घाव घातले त्यामुळे महाराष्ट्र कोलडमडून गेला. शिवसेना कोलमडून गेली, अजिबात नाही, आम्ही उभे आहोत, लढणार एकदिवस तुम्हाला घरी पाठवणार असही राऊत म्हणाले.
काल राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. उद्ध ठाकरे यांच्याशीही चर्चा झाली. वरळीला डोम सभागृह आहे, तिथे हा सोहळा होईल. शिवसेनेने आधी शिवतीर्थ मिळावं यासाठी अर्ज केला. हा अर्ज पेंडिंग आहे. अनिल परब त्या साठी प्रयत्न करत आहेत. हे सरकार परवानगी देणार नाही. हे आम्हाला माहित आहे. मनसे प्रमुखांनी डोमचा पर्याय सुचवला. आम्ही स्वीकारला सर्वांची काल बैठक झाली. कार्यक्रमाच स्वरुप काय आणि कसं असावं, किती माणस येतील, यावर चर्चा केलीv असेही राहू त्यांनी सांगितले.
Anil Bonde : आपलं पाप झाकण्यासाठी उद्धव ठाकरेंचा हा प्रयत्न होता !
पाच जुलैला साधारण 12 च्या सुमारास कार्यक्रम होईल. उद्धव आणि राज ठाकरे उपस्थित राहतील. याविषयी आता दुमत, शंका असण्याचं कारण नाही. या लढ्यात जे सहभागी झाले ते डावे पक्ष या सगळ्यांना आम्ही आमंत्रित करत आहोत. ही मराठी एकजूट, महाराष्ट्राची एकजूट राजकीय पक्षांपलीकडची आहे. जेव्हा-जेव्हा दिल्लीने अघोरी कायद्याच्या आधारे, सत्तेच्या आधारावर आमच्यावर हल्ले केले, महाराष्ट्र हा अधिक ताकदीने, उसळून उभा राहिला असं राऊत यांनी स्पष्ट केलं.