Breaking

Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : तुरूंगात टाका, चालेल.. पण शेतकऱ्यांसाठी लढ राहू !

Congress leader Vijay Vadettiwar aggressive for farmers : सरकार बबनराव लोणीकरांचे समर्थन करतेय का ?

Mumbai : सत्ताधारी वारंवार शेतकऱ्यांचा अपमान करतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, यासाठी महाविकास आघाडीचे आमदार आज आक्रमक झाले. शेतकऱ्यांच्या विषयावर काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टवार, नाना पटोले विधानसभा अध्यक्षांच्या स्थानाकडे गेले. यावेळी शेतकऱ्यांच्या विषयांवर विरोधकांना सभागृहात बोलू दिले जात नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या विषयांवर आंदोलन करू. आम्हाला तुरुंगात टाकले तरी चालेल, पण शेतकऱ्यांसाठी आम्ही लढत राहू, अशी आक्रमक भूमिका विजय वडेट्टीवार यांनी घेतली.

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज (१ जुलै) शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक झाले. कृषिमंत्री शेतकऱ्यांविरोधात विधान करतात, भाजपचे माजी मंत्री आणि आमदार बबनराव लोणीकर यांनीदेखील शेतकऱ्यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले यावर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला. शेतकऱ्यांचा वारंवार अपमान सत्ताधारी करत असल्याने मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या आमदारांनी केली. शेतकऱ्यांच्या विषयावर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले विधानसभा अध्यक्षांच्या स्थानाजवळ गेले.

Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : नाना भाऊ काल दिल्लीला होते, त्यांचा अभ्यास झाला नाही !

वाढत्या गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर विरोधकांनी माफी मागा म्हणून घोषणाबाजी केली. त्यावेळी विधानसभा अध्यक्षांनी नाना पटोले यांच्यावर एक दिवसाच्या निलंबनाची कारवाई केली. महाविकास आघाडीच्या नेत्यांना सभागृहात बोलूच दिले जात नाही, उलट शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलल्यावर कारवाई करण्यात येते. यावर महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. विरोधकांनी पूर्ण दिवसाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला.

Sanjay Raut : आमच्यावर हल्ले झाले, तेव्हा महाराष्ट्र अधिक ताकदीने, उसळून उभा राहिला

राज्यात आज शक्तिपीठ महामार्ग विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन चालू आहे. बारा जिल्ह्यांतील शेतकरी या महामार्गाला विरोध करत आहेत. दुसरीकडे राज्याचे कृषिमंत्री शेतकऱ्यांविरोधात विधान करतात, सत्ताधारी आमदार बबनराव लोणीकर ‘शेतकरी आमच्या पैशावर जगतात’, अशी उपकाराची भाषा करतात. लोणीकर यांच्यावर कारवाई होत नाही. यावरूनच त्यांचे समर्थनच सरकार करत आहे का, असा सवालही वडेट्टीवार यांनी केला.