Breaking

Kanchan Gadkari : कांचन गडकरी म्हणाल्या, ‘आईकडून वारसा, नितीनजींचे मार्गदर्शन’!

Nitin Gadkari guides his wife for new experiments in agriculture : कृषी विकास प्रतिष्ठानचा ‘प्रयोगशील शेती पुरस्कार’ प्रदान

Nagpur धापेवाडा येथे शेती करताना केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांचे सातत्याने मार्गदर्शन मिळत असते. त्यांच्या मार्गदर्शनातच शेतीत विविध प्रयोग करण्‍याची संधी मला मिळते, या शब्दांत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी यांनी प्रयोगशील शेतीमागचे रहस्य उलगडले.

वसंतराव नाईक प्रतिष्ठान आणि वनराई फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा प्रयोगशील शेती पुरस्कार यंदा कांचन गडकरी यांना प्रदान करण्यात आला. ३० हजार रुपये रोख व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते. कांदा आणि ऊसाच्या विक्रमी उत्पादनासह कांचन गडकरी यांनी गेल्या २६ वर्षांत शेतीमध्ये अनेक नवनवे यशस्वी प्रयोग केले आहेत. त्यांच्या योगदानाची दखल घेत कांचन गडकरी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Nitin Gadkari : दुचाकीवर टोल टॅक्स? काहीही बातम्या देता राव!

सत्काराला उत्तर देताना त्या म्हणाल्या, ‘आईकडून शेतीचा वारसा मिळाला. आम्ही भावंड लहान असताना वडील गेले. त्यानंतर आईने शेती करून आम्हाला मोठं केलं. चांगलं शिक्षण दिलं आणि आपल्या पायावर उभं केलं. लग्नानंतर मला सासूबाईंची साथ मिळाली. ‘एक गाय आणि एक एकर शेती’ एवढं आपल्याकडे असेल तर आपल्या कुटुंबाचा गाडा आपण व्यवस्थित हाकू शकतो, असं त्या म्हणायच्या. नितीनजींनी तर सातत्याने शेतीच्या संदर्भात मार्गदर्शन केलं.’

Nitin Gadkari : १२ वर्षांच्या विराजमध्ये ‘विशेष’ टॅलेंट, गडकरींनी केले कौतुक!

पाणी, मृदा आणि वेळेचे योग्‍य व्‍यवस्‍थापन केल्यामुळे विविध प्रयोग करता आले व त्‍यात यश मिळाले, असे त्‍या म्हणाल्या. ‘हा पुरस्कार मला स्वीकारायचा नव्हता. पण ‘तू पुरस्कार स्वीकारशील तर इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल’, असं मला नितीनजी म्हणाले. त्यानंतर हा पुरस्कार स्वीकारण्याचा निर्णय मी घेतला, असं त्या म्हणाल्या. पुरस्काराची रक्कम धापेवाडा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्‍थानाला प्रदान करत असल्याची घोषणा त्यांनी केली.